Salman Khan Birthday : बॉलिवूडचा दबंग स्टार झाला 57 वर्षांचा; केक कट करत सलमानने चाहत्यांचे मानले आभार
Salman Khan : सलमान खानने आजवर 80 सिनेमांत आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.
Salman Khan Birthday : बॉलिवूडचा दबंग स्टार अर्थात सलमान खानचा (Salman Khan) आज वाढदिवस आहे. आज भाईजान 57 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनत्याने वाढदिवसानिमित्त सिनेसृष्टीतील मंडळींसाठी त्याच्या बहिणीच्या घरी एका खास पार्टीचे आयोजन केलं होतं.
सलमान खानने आयोजित केलेल्या पार्टीत शाहरुख खान, अरबाज खान, सोहेल खान, अर्पिता खान, आयुष शर्मा, अतुल अग्निहोत्री, तब्बू, संगीता बिजलानी, सोनाक्षी सिन्हा, सिद्धांत चतुर्वेदी, कार्तिक आर्यन, जिनिलिया देशमुख, रितेश देशमुख, पुलकित सम्राट, कृती खरबंदा, पूजा हेगडे अशी सिनेसृष्टीतील अनेक मंडळी उपस्थित होती.
वाढदिवसाच्या पार्टीत सलमान खान ब्लॅक लूकमध्ये दिसून आला. सलमानच्या वाढदिवसाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. भाईजानने वाढदिवसाचा केक कट करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. चाहते, मित्र आणि सेलिब्रिटींच्या उपस्थितीत सलमानने केक कट केला आहे.
View this post on Instagram
सलमान खानचे अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले आहेत. टायगर जिंदा है, बजरंगी भाईजान आणि सुलतान या त्याच्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. गेली अनेक दशके तो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. सोशल मीडियावर तो चांगलाच अॅक्टिव्ह आहे. त्याचा चाहतावर्गही मोठा आहे.
सलमानने पूर्ण केलं 'किसी का भाई किसी की जान'चं शूटिंग
सलमान खानने नुकतचं 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. फरहाद सामजीने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या अॅक्शनपटात पूजा हेगडेदेखील मुख्य भूमिकेत आहे. तसेच शहनाज गिल, पलक तिवारी आणि विजेंद्र सिंहदेखील या सिनेमाचा भाग आहेत. हा सिनेमा 2023 च्या ईदला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'या' दिवशी प्रदर्शित होणार 'टायगर 3'
सलमान खानच्या आगामी 'टायगर 3' (Tiger 3) या सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे. आधी हा सिनेमा 23 एप्रिल 2023 रोजी प्रदर्शित होणार होता. पण आता या सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. हा सिनेमा येत्या वर्षात दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच आणखी दोन सिनेमांची तो लवकरच घोषणा करणार आहे.
संबंधित बातम्या