Salman Khan Birthday Celebration: भाई का बड्डे है; सलमानच्या घराबाहेर चाहत्यांचा जल्लोष, पाहा व्हिडीओ
Salman Khan Birthday Celebration: सलमान खानचे चाहते त्याच्या घराबाहेर डान्स करत आहेत. अशताच सलमानच्या घराबाहेरील चाहत्यांचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
Salman Khan Birthday Celebration: बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा (Salman Khan) आज 58 वा वाढदिवस आहे. सलमानचे चाहते तसेच बॉलिवूडमधील सेलिब्रिटी हे सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सलमानने रात्री कुटुंब आणि मित्रांसोबत वाढदिवस साजरा केला, याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता सलमानचे चाहते त्याच्या घराबाहेर जमले असून ते जल्लोष कर आहेत. सलमान खानचे चाहते त्याच्या घराबाहेर डान्स करत आहेत. अशताच सलमानच्या घराबाहेरील चाहत्यांचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
सलमानच्या घराबाहेर चाहत्यांनी केला जल्लोष (Salman Khan Birthday Celebration)
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये चाहते सलमानच्या घराच्या बाहेर रत्यावर डान्स करताना दिसत आहेत. भाईजानच्या वाढदिवसानिमित्त चाहते खूप उत्सुक आहेत. सलमानची एक झलक पाहण्यासाठी सलमानचे चाहते सलमानच्या घराबाहेर जमले आहेत.
व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स
सलमान खानच्या चाहत्यांच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओला एका नेटकऱ्यांनी कमेंट केली,"भाई का बड्डे है" तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "हे खूपच क्युट आहे"
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
सलमान खानच्या वाढदिवसानिमित्त करण जोहर, बॉबी देओल यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बॉबीनं सलमानसोबतचा फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "मामू आय लव्ह यू" तर करणनं देखील खास सलमानचा फोटो सोशल मीडियावर शेअर करुन त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी सलमानचा टायगर-3 हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटात कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी यांनी देखील काम केलं. या चित्रपटाचं दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केलं तो सध्या बिग बॉस 17 हा कार्यक्रम होस्ट करत आहे.ट्युबलाईट, किक, बजरंगी भाईजान, दबंग या सलमानच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. टायगर व्हर्सेस पठाण या चित्रपटामधून सलमान प्रेक्षकांच्या भेटीला येणार, असं म्हटलं जात आहे. सलमानच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
संबंधित बातम्या: