एक्स्प्लोर
करण जोहरच्या आगामी सिनेमात सलमान-कतरिना एकत्र?
![करण जोहरच्या आगामी सिनेमात सलमान-कतरिना एकत्र? Salman Khan And Katrina Kaif To Team Up In Karan Johars Upcoming Movie Latest Updates करण जोहरच्या आगामी सिनेमात सलमान-कतरिना एकत्र?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/04082503/SALMAN-KATRINAA-580x395.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : दिग्दर्शक अली अब्बास जफरच्या ‘टायगर जिंदा है’ नंतर आता अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. निर्माता करण जोहरच्या पुढील सिमेनात दोघे एकत्र दिसणार, असं बोललं जात आहे.
करण जोहरच्या या सिनेमात आधी पाकिस्तानी अभिनेता फवाद खानला भूमिका देण्यात आली होती, असं बोललं जातं. पण काही वृत्तांनुसार करण जोहरच्या ‘ए दिल है मुश्किल’ या सिनेमात झालेल्या वादामुळे फवादला या सिनेमातून वगळण्यात आलं आहे.
‘ए दिल है मुश्किल’ या सिनेमाच्या रिलीजच्या वेळी उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आली होती. या बंदीनंतर करण जोहरनेही कोणत्याही पाकिस्तानी कलाकारासोबत काम करणार नसल्याचं सांगितलं. याच कारणामुळे फवाद आणि कतरिनाला घेऊन बनवण्यात येणारा सिनेमा आता सलमानला घेऊन करणार असल्याची चर्चा आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
क्रिकेट
पुणे
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)