एक्स्प्लोर
''सलमान चित्रपटात माकडासारखं नाचतो''
मुंबई: प्रसिद्ध टीव्ही रिऑलिटी शो 'बिग बॉस'ची एक्स कंटेस्टंट आणि वांद्रामधील Mad o Wot सलूनची मालकीण हेअर स्टाईलिस्ट सपना भवनानीने बॉलिवूडचा दबंग खान सलमान खानला लक्ष्य केले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने खराब चित्रपटात सलमान खान माकडासारखं नाचतो, तसेच लोकांचा चुकीच्या पद्धतीने वापर करतो, अशी टीका केली आहे.
सलमानच्या चाहत्यांकडून बलात्काराची धमकी
सपनाने हिंदूस्थान टाईम्स या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलखतीत सलमानला लक्ष्य केले आहे. या मुलाखतीवेळी तिने 'बिग बॉस' शोनंतर सलमानवर टीका केल्याने, त्याच्या चाहत्यांकडून जीवे मारण्याची आणि बलात्काराची धमकी मिळाल्याचे सांगितले.
सलमान लोकांचा अपमान करतो
याशिवाय सपनाने या मुलाखतीत बिग बॉस हा फालतू कार्यक्रम असल्याचे म्हटले आहे. ''हा एक असा शो आहे, ज्यामध्ये कार्यक्रमाचा सूत्रसंचालक लोकांचा अपमान करतो,'' असे ती म्हणाली. विशेष म्हणजे ती इतकेच म्हणून थांबली नाही, तर सलमानचे अनुकरण करणाऱ्या कलाकारांनाही तिने लक्ष्य केले आहे. ''ही मंडळी त्याची देवाप्रमाणे पूजा करतात. कारण त्याच्या कोणत्याही चित्रपटात काम मिळू शकेल. पण सलमान त्याच फालतू चित्रपटात माकडासारखं नाचतो.''
भारतीय असल्याची लाज वाटते
सलमानच्या बलात्कारासंबंधीच्या वादग्रस्त वक्तव्यावर सपना म्हणाली की, ''सलमानचे हे वक्तव्य आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीयांची प्रतिमा खराब करणारे आहे. जेव्हा अशा प्रकारची वक्तव्ये समोर येतात, तेव्हा मला भारतीय असल्याची लाज वाटते.''
दरम्यान, या मुलाखतीवेळी तिने आपल्या अपकमिंग Chapter One या पुस्तकाविषयी माहिती दिली. तिने आपल्या पुस्तकात सलमानचा उल्लेख आहे का? यासंबंधी विचारले असता, ''हा माणूस लोकांचा वापर करतो, त्यामुळे मी अशा माणसाला माझ्या पुस्तकात स्थान देत नाही,'' असे सांगितले.
तिच्या पुस्तकासाठी ही मुलाखत असल्याचे तिने नंतर ट्वीट करून स्पष्ट केले.
Salman has nothing to do with my book. This journalist decided to sell her story with gossip n it's working for them https://t.co/hj2BolaWfB
— Sapna Moti Bhavnani (@sapnabhavnani) August 23, 2016
To be honest why would the Journo bring up Bollywood in a book interview?In my book interview? #GossipJournalism https://t.co/8tiqMaRQYO — Sapna Moti Bhavnani (@sapnabhavnani) August 23, 2016
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement