(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Salaar Cast Fees : प्रभासची कोटींची उड्डाणे! 'सालार'साठी कोणी किती मानधन घेतलं? सुपरस्टारची Fee पाहून व्हाल थक्क
Prabhas : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा 'सालार' (Salaar) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Salaar Cast Fees : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा (Prabhas) 'सालार' (Salaar) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमासाठी प्रत्येकाने तगडं मानधन घेतलं आहे. या सिनेमात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas), श्रुती हासन (Shruti Haasan), पृथ्वीराज (Prithviraj), सुकुमारन (Sukumaran) आणि जगपती बाबू महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. प्रशांत नील (Prashanth Neel) यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
प्रभासचं तगडं मानधन (Prabhas Salaar Fees)
इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार,'सालार' या सिनेमाची निर्मिती 400 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे. या सिनेमासाठी प्रभासने 100 कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे. तसेच सिनेमाच्या यशातले 10 टक्केदेखील तो घेणार आहे. 'सालार'नंतर प्रभास दीपिका पादुकोण, कमल हासन आणि अमिताभ बच्चन यांच्या 'कल्कि 2898 एडी' या सिनेमात झळकणार आहे. हा बिग बजेट पॅन इंडिया सिनेमा आहे.
'सालार' या सिनेमातील पृथ्वीराज सुकुमारनची भूमिका छोटी आहे. या भूमिकेसाठी पृथ्वीराजने चार कोटी रुपये चार्ज केले आहेत. या सिनेमात अभिनेत्री श्रुती हासन प्रभाससोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या सिनेमासाठी तिला 8 कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे. सिनेमात प्रभास, पृथ्वीराज आणि श्रुतीसह जगपती बाबू महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. जगपती बाबूने या सिनेमासाठी चार कोटी रुपये आकारले आहेत.
प्रशांत नीलने किती रुपये घेतले? (Prashanth Neel Fees)
'सालार' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा प्रशांत नीलने (Prashanth Neel) सांभाळली आहे. प्रशांत नील यांनी याआधी 'केजीएफ', 'केजीएफ 2'च्या माध्यमातून बॉक्स ऑफिसवर राज्य केलं आहे. 'सालार' या सिनेमासाठी प्रशांत नील यांनी चांगलच मानधन घेतलं आहे. तब्बल 50 कोटी रुपये त्यांनी चार्ज केले आहेत.
अॅडव्हान्स बुकिंगमध्ये प्रभासच्या 'सालार'चा धमाका (Salaar Advance Booking)
'सालार' या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला आता सुरुवात झाली आहे. आतापर्यंत या सिनेमाचे 22 हजार 117 तिकिट विकले गेले आहेत. त्यामुळे रिलीजआधी या सिनेमाने 49.35 लाख रुपयांची कमाई केली आहे. तेलुगू, मल्याळम आणि तामिळमध्येही या सिनेमाने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये चांगलाच धमाका केला आहे.
'सालार'ला मिळालंय 'A' सर्टिफिकेट
प्रशांत नील दिग्दर्शित 'सालार' या सिनेमाला 'A' सर्टिफिकेट मिळालं आहे. 2 तास 55 मिनिटांच्या या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) सिनेमासोबत या सिनेमाची टक्कर होणार आहे.
संबंधित बातम्या