(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Salaar Song Out : प्रभासच्या 'सालार'मधील फर्स्ट सॉन्ग आऊट! 'सूरज ही चांहू बनके'मध्ये दिसले मैत्रीचे बंध
Salaar Song Out : प्रभासच्या (Prabhas) 'सालार' या सिनेमातील 'सूरज ही चांहू बनके' (Sooraj Hi Chhaon Banke) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Salaar Song Out : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा (Prabhas) 'सालार' (Salaar) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. आता या बहुचर्चित सिनेमातील 'सूरज ही चांहू बनके' (Sooraj Hi Chhaon Banke) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. मैत्रीचे बंध असणाऱ्या या गाण्याने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
'सालार'मधील फर्स्ट सॉन्ग आऊट!
प्रभास (Prabhas) आणि श्रुती हासन (Shruti Haasan) यांच्या आगामी 'सालार' या सिनेमातील पहिलं गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. दोन मित्रांच्या मैत्रीवर आधारित हे गाणं आहे. मैत्रीचे बंध दाखवणारं हे गाणं ऐकताना प्रेक्षकांच्या अंगावर शहारे येतील. प्रभास आणि पृथ्वीराज सुकुमारन अशा दोन मित्रांची गोष्ट प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळणार आहे. या गाण्याचे बोल रिया मुखर्जीने लिहिले असून मेनुका पेदुलने हे गाणं गायलं आहे. तर रवी बसरुरने संगीत दिलं आहे.
View this post on Instagram
'सालार'ला मिळालं ए सर्टिफिकेट
'सालार' या सिनेमाला 'ए' सर्टिफिकेट मिळालं असल्याची माहिती आहे. प्रशांत नीलने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. अमर मैत्री आणि भावनांची झलक प्रेक्षकांना ट्रेलरमध्येही पाहायला मिळत आहे. या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा ड्रामा पाहायला मिळत आहे. 2 तास 55 मिनिटांच्या या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
'सालार' कधी होणार रिलीज? (Saalar Release Date)
'सालार' हा सिनेमा 22 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. होम्बले फिल्म्सच्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. प्रभा, श्रुती हासन, पृथ्वीराज सुकुमारन, जगपती बाबू अशी तगडी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा आहे.
'सालार' या सिनेमाचे ओटीटी राइट्स 80 कोटी रुपयांत विकले गेले असल्याची माहिती आहे. प्रभासचे चाहते 'सालार' या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. याआधी त्याचे 'आदिपुरुष' आणि 'राधे श्याम' हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले होते.
संबंधित बातम्या