Salaar Box Office Collection Day 14: प्रभासच्या ‘सालार’ च्या कमाईत दिवसेंदिवस घसरण; जाणून घ्या 14 दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन
Salaar Box Office Collection Day 14: सालार या चित्रपटाच्या कमाईत दुसऱ्या आठवड्यात घसरण झाली आहे. 'सालार' या चित्रपटानं रिलीजच्या 14 व्या दिवशी किती कमाई केली? हे जाणून घेऊयात...
Salaar Box Office Collection Day 14: अभिनेता प्रभासचा (Prabhas) 'सालार' (Salaar) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 'सालार' या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. अशातच सालार या चित्रपटाच्या कमाईत दुसऱ्या आठवड्यात घसरण झाली आहे. 'सालार' या चित्रपटानं रिलीजच्या 14 व्या दिवशी किती कमाई केली? हे जाणून घेऊयात...
'सालार'चे कलेक्शन (Salaar Box Office Collection Day 14)
प्रभासच्या 'सालार' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दोन आठवड्यांपासून राज्य करतोय. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 'सालार' या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 308 कोटींची कमाई केली होती.
रिलीजच्या दुसऱ्या आठवड्यात सालार या चित्रपटाच्या कमाईत घसणार झाली आहे. 'सलार' या चित्रपटानं रिलीजच्या 8 व्या दिवशी 9.62 कोटी, 9 व्या दिवशी या चित्रपटानं 12.55 कोटी, 10व्या दिवशी 15.1 कोटी, 11व्या दिवशी 16.6 कोटी, 12व्या दिवशी 6.45 कोटी आणि 13व्या दिवशी 5.18 कोटी कमावले आहेत. आता चित्रपटाच्या रिलीजच्या 14 व्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. Sacnilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'सालार' ने रिलीजच्या दुसऱ्या गुरुवारी म्हणजेच 14 व्या दिवशी 4.50 कोटी रुपये कमवले आहेत.
ट्रेंड अॅनेलिस्ट मनोबाला विजयबालन यांच्या मते, सालार या चित्रपटानं 13 दिवसांत जगभरात 650 कोटींची कमाई केली आहे.
#Salaar WW Box Office
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) January 4, 2024
#Prabhas' Salaar ENTERS ₹6️⃣5️⃣0️⃣ cr club on its 13th Day.
₹650 cr+ South movies#SalaarCeaseFire#Baahubali#Jailer#2Point0#KGFChapter2#RRR#Baahubali2
Day 1 - ₹ 176.52 cr
Day 2 - ₹ 101.39 cr
Day 3 - ₹ 95.24 cr
Day 4 -… pic.twitter.com/VsP34VpMB2
'सालार' ची स्टार स्टार (Salaar Box Office Collection)
'सालार' हा चित्रपट खानसार या काल्पनिक शहरावर आधारित आहे. ही कथा प्रभास आणि सुकुमारन यांनी साकारलेल्या देवा आणि वर्धा या पात्रांभोवती फिरतो. या चित्रपटात श्रुती हासन, ईश्वरी राव, जगपती बाबू आणि श्रिया रेड्डी यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार आहेत. प्रशांत नील दिग्दर्शित हा चित्रपट 22 डिसेंबर 2023 रोजी तेलुगु, कन्नड, तमिळ, मल्याळम आणि हिंदीमध्ये प्रदर्शित झाला.
'सालार 2' कधी रिलीज होणार? (Salaar 2 Release Date)
'सालार 2' हा सिनेमा 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्मात्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.निर्माते विजय किरगंदुर यांनी 'सालार 2' या सिनेमाची संहिता तयार केली आहे, असं म्हटलं जात आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Salaar 2 : प्रभासच्या 'सालार 2'बाबत मोठी अपडेट समोर; 2025 मध्ये रिलीज होणार सिनेमा