Saiyami Kher On Surgery: वयाच्या 18 व्या वर्षी लोकांनी दिला होता सर्जरी करण्याचा सल्ला; सैयामी खेरनं सांगितला किस्सा
नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सैयामीनं (Saiyami Kher)एक किस्सा सांगितला.
![Saiyami Kher On Surgery: वयाच्या 18 व्या वर्षी लोकांनी दिला होता सर्जरी करण्याचा सल्ला; सैयामी खेरनं सांगितला किस्सा Saiyami Kher reveals she was asked to get a lip and nose job done when she was 18 year old Saiyami Kher On Surgery: वयाच्या 18 व्या वर्षी लोकांनी दिला होता सर्जरी करण्याचा सल्ला; सैयामी खेरनं सांगितला किस्सा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/04/51148d9ca483424285d51ce7b53651eb1691144566267259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Saiyami Kher On Surgery: 'रे' या तेलुगू चित्रपटामधून अभिनय क्षेत्रातील करिअरची सुरुवात करणारी सैयामी खेर (Saiyami Kher) ही तिच्या अभिनयानं आणि ग्लॅमरस स्टाईलनं प्रेक्षकांची मनं जिंकते. सैयामी ही सध्या 'घूमर' (Ghoomer) या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सैयमीच्या घूमर या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सैयामीनं एक किस्सा सांगितला. तिनं सांगितलं, वयाच्या 18 व्या वर्षी तिला काही लोकांनी ओठ आणि नाकाची सर्जरी करुन घेण्याचा सल्ला दिला होता.
सैयामीनं सांगितला किस्सा
एका मुलाखतीमध्ये सैयामीनं सांगितलं "जेव्हा मी करिअरला सुरुवात करत होतो, तेव्हा बरेच लोकांनी मला लिप जॉब आणि नाकाची सर्जरी करण्याचा सल्ला दिली होती. मला वाटते की, वयाच्या 18 व्या वर्षी हा सल्ला देणे चुकीचे आहे. हा माझा अनुभव आहे."
पुढे सैयामीनं सांगितलं "बॉलिवूड इंडस्ट्रीच्या या नियमांचा मला त्रास झाला नाही पण, मला आशा आहे की, एक ना एक दिवस या सर्व गोष्टी आपल्या इंडस्ट्रीमध्ये पूर्णपणे गायब होतील."
"मी फक्त माझ्या कुटुंबाच्या आणि जवळच्या मित्रांच्या मतांचा विचार करते. ते एकमेव लोक आहेत ज्यांची मतं खरोखर माझ्यासाठी महत्त्वाची आहेत. सकारात्मक गोष्टी सांगणे चांगली गोष्ट आहे कारण ते एखाद्या व्यक्तीला चांगले बनवते, परंतु मी खूप भाग्यवान होतो की माझे कुटुंब मला सपोर्ट करते कारण त्यांनी मला खूप कठीण काळात साथ दिली." असंही सैयामीनं मुलाखतीमध्ये सांगितलं.
'मिर्झ्या' या चित्रपटातून सैयामीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आता तिच्या घुमर या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. "घूमर" हा चित्रपट 18 ऑगस्ट 2023 रोजी रिलीज होणार आहे.
View this post on Instagram
आर. बाल्की यांनी घुमर हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात सैयामीसोबतच अभिनेता अभिषेक बच्चन आणि अंगद बेदी हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटात अभिनेते अमिताभ बच्चन यांची झलक देखील प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)