एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
'सैराट'फेम 'प्रिन्स' सुरज पवारच्या कुटुंबीयांना मारहाण
!['सैराट'फेम 'प्रिन्स' सुरज पवारच्या कुटुंबीयांना मारहाण Sairat Fame Prince Actor Suraj Pawars Family Beaten Up 'सैराट'फेम 'प्रिन्स' सुरज पवारच्या कुटुंबीयांना मारहाण](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/05/07055454/suraj-pawar.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पंढरपूर : 'सैराट'मध्ये आर्चीच्या भावाची भूमिका करणारा 'प्रिन्स'दादा उर्फ अभिनेता सुरज पवार याच्या कुटुंबीयांना मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापुरातील करमाळा तालुक्यातील
पोफळज या गावात मारहाणीची प्रकार घडला आहे. या प्रकरणी 8 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरज पवारचे आजी-आजोबा, भाऊ-बहिणी पोफळज गावात राहतात. दोन दिवसांपूर्वी गावातील एका तरुणाला शेतातून येताना काही पारधी समाजाच्या लोकांनी मारहाण करुन लुटल्याची घटना घडली होती.
ही घटना सुरज पवार याच्या कुटुंबीयांशी संबंधित असलेल्या व्यक्तींकडून झाल्याच्या संशयाने गावातील आठ जणांनी घरात घुसून सुरजचे आजी-आजोबा आणि इतर कुटुंबीयांना मारहाण केली. मारहाणीनंतर पवार कुटुंबाच्या घरातील सामानाची तोडफोडही करण्यात आली.
या घटनेनंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. घडलेल्या प्रकारानंतर घरातील तरुण व वयस्कर मंडळी घर सोडून बाहेर गेले असून पोलिसांचा पहारा ठेवण्यात आला आहे. सध्या घरात लहान मुलेच असून या घटनेची माहिती सुरजलाही कळविण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)