Saira Banu Post : दिलीप कुमार यांच्या दुसऱ्या पुण्यतिथी निमित्त सायरा बानोची भावनिक पोस्ट
दोन वर्षापूर्वी दिग्गज अभिनेता दिलीप कुमार यांचे आजाराने निधन झाले. आज त्यांची पुण्यतिथी आणि त्यांच्याच आठवणीत सायरा बानोने तिच्या इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट टाकली आहे.
Saira Banu Post On Dilip Kumar Death Anniversary : दोन वर्षापूर्वी दिग्गज अभिनेता दिलीप कुमार (Dilip Kumar) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. आज त्यांची पुण्यतिथी आणि त्यांच्याच आठवणीत सायरा बानोने तिच्या इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट टाकली आहे. त्या पोस्टच्या खाली तिने दिलीप कुमार यांच्या आठवणीत मोठी नोट लिहिले आहे. जवळपास पाच दशकं दिलीप कुमार यांनी चित्रपटसृष्टी गाजवली आहे. त्यांच्या या प्रवासात त्यांनी अतिशय चांगले चित्रपट या सिनेसृष्टीला दिले आहेत. भारतीय सिनेसृष्टीत दिलीप कुमार 'ट्रॅजेडी किंग' म्हणून ओळखले जायचे. दिलीप कुमार यांना पद्मभूषण , पद्मविभूषण अशा अनेक पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले आहे. वयाच्या 44 व्या वर्षी त्यांनी अभिनेत्री सायरा बानूशी (Saira Banu) लग्न केले.
काय आहे पोस्टमध्ये
अभिनेत्री सायरा बानोने पोस्टमध्ये लिहिले आहे की, "आज दिलीप साहेबांची दुसरी पुण्यतिथी.अजूनही ते माझाच सोबत आहे असे मला वाटते.आम्ही दोघे सोबतच जीवन जगत आहोत असेच वाटते. शरीराने ते माझासोबत नसले तरीही ते मनाने माझा सोबत आहेत.दिलीप साहेब हे केवळ माझ्यासाठीच नाही तर आजच्या काळातील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणा आहेत".पुढे त्यांनी लिहिले आहे, "दिलीप कुमार यांनी चित्रपट क्षेत्र आणि त्याचसोबत सामाजिक क्षेत्रामध्ये दिलेले योगदान आणि त्यांचे विचार मला यावेळी शेअर करायला आवडेल. एक अभिनेता म्हणून त्यांचं कार्य उल्लेखनीय आहेच पण त्याचसोबत त्यानी जगाकडे मानवतावादी दृष्टीकोनातून पाहिलं आणि हा त्यांचा मोठेपणा आहे."
वयाच्या पंचविसाव्या वर्षी दिलीप कुमार यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. 11 डिसेंबर 1900 रोजी दिलीप कुमार यांचा जन्म पाकिस्तानात झाला.त्यांच्या घरची परिस्थिती बिकट असल्याने त्यांनी पुण्यात येऊन नोकरी करायला सुरूवात केली. दिलीप कुमार यांनी 'ज्वार भाटा' या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं आणि परत मागे वळून कसलेच पाहिले नाही. दिदार आणि देवदास या चित्रपटातील गंभीर अभिनयामुळे त्यांना 'ट्रॅजेडी किंग'असे नाव देण्यात आले होते. दिलीप कुमार यांनी पाच दशकात त्यांनी 57 पेक्षा अधिक सिनेमांत काम केलं आहे.
दिलीप कुमार यांचे टॉप 10 सिनेमे (Dilip Kumar Top 10 Movies) :
- मुगल-ए-आजम
- अंदाज
- नया दौर
- देवदास
- राम और श्याम
- मधुमती
- गोपी
- आजाद
- शक्ति
- सगीना
इतर महत्वाच्या बातम्या