एक्स्प्लोर

Happy Birthday Saira Banu : आईच्या पावलावर पाऊल ठेवत मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या सायरा बानो! वाचा अभिनेत्रीबद्दल...

Saira Banu Birthday : सायरा बानो (Saira Banu) बॉलिवूडच्या अशा प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहेत, ज्यांनी आपल्या सौंदर्य आणि अभिनय कौशल्याने सर्वांची मने जिंकण्यात यश मिळवले आहे.

Saira Banu Birthday : सायरा बानो (Saira Banu) बॉलिवूडच्या अशा प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहेत, ज्यांनी आपल्या सौंदर्य आणि अभिनय कौशल्याने सर्वांची मने जिंकण्यात यश मिळवले आहे. त्यांच्या स्टाईलने प्रेक्षकांना त्यांचे चाहते बनवले आहे. सायरा बानो आज (23 ऑगस्ट) आपला वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म 23 ऑगस्ट 1944 रोजी भारतात झाला. त्यांच्या आई नसीम बानो (Naseem Banu) या देखील त्यांच्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्यांचे वडील मियां एहसान-उल-हक हे चित्रपट निर्माते होते. त्यांनी 'फूल' आणि 'वादा' चित्रपटाची निर्मिती केली होती. अर्थात अभिनयाचा वारसा सायरा यांना कुटुंबाकडूनच मिळाला होता.

लहान वयातच सायरा लंडनला शिक्षणासाठी गेल्या होत्या. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला. सायरा यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यांनी नेहमीच एक यशस्वी अभिनेत्री बनण्याचे स्वप्न पाहिले होते. आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्यांनी पुढे चित्रपटातच काम करण्याचा निर्णय घेतला.

वयाच्या 17व्या वर्षी बॉलिवूड पदार्पण!

अभिनेत्री सायरा बानो यांनी वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यांनी 1961मध्ये अभिनेते शम्मी कपूर (Shammi Kapoor) यांच्यासोबत 'जंगली' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात त्यांच्या अभिनयाची आंनी सौंदर्याची जादू अशा प्रकारे पसरली की, त्यांचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला. या चित्रपटासाठी सायरा यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठीही नामांकन मिळाले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही सुपरहिट ठरला. या चित्रपटाच्या यशामुळे सायरा मनोरंजनसृष्टीच्या लाडक्या बनल्या. यानंतर त्यांना एकामागून एक हिट चित्रपट मिळत गेले. 60 आणि 70चे दशक सायरा यांच्यासाठी सुवर्णकाळ ठरले.

बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्रींमध्ये गणना

सायरा यांची गणना बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींमध्ये केली जात होती. सायरा यांच्या करिअरसाठी 1967 हे वर्ष खूप महत्त्वाचे ठरले. या वर्षी त्यांचे 'दीवाना' आणि 'शागिर्द' हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. हे दोन्ही चित्रपट सुपरहिट ठरले. 1968 साली प्रदर्शित झालेला 'पडोसन' हा चित्रपट सायरा बानोच्या सिने करिअरमधील मैलाचा दगड ठरला. या चित्रपटाने त्यांना खूप प्रसिद्धी मिळवून दिली.

दिलीप कुमार यांच्यावर जडला जीव!

चित्रपटांपेक्षा सायरा बानो दिलीप कुमार (Dilip Kumar) यांच्यासोबतच्या नात्यामुळे चर्चेत राहिल्या. सायरा यांना लहान असल्यापासून आईप्रमाणे अभिनेत्री व्हायचे होते. मात्र, वयाच्या 12व्या वर्षापासून सायरा यांना दिलीप कुमार आवडू लागले होते. जेव्हा, सायरा यांनी आपले प्रेम व्यक्त केले तेव्हा, सायरा 22 वर्षांच्या तर, दिलीप कुमार 44 वर्षांचे होते. मात्र, प्रेमात दोनदा अपयशी ठरलेल्या दिलीप कुमार यांनी सायरामध्ये अजिबात रस दाखवला नव्हता. वयाच्या फरकामुळे दिलीप या नात्यापासून दूर जात होते. पण, सायरा यांच्या प्रेमासमोर त्यांनी हार मानली आणि 1966मध्ये त्यांनी आपले प्रेम जाहीर केले आणि लग्न केले.

 हेही वाचा :

Entertainment News Live Updates 23 August : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident : लोखंडी वस्तू भरलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक, सळ्या तरुणांच्या शरीरातून आरपार ; नाशिकच्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा 8 वर
लोखंडी वस्तू भरलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक, सळ्या तरुणांच्या शरीरातून आरपार ; नाशिकच्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा 8 वर
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील संतोष देशमुखांच्या कुटुबीयांची मस्साजोगमध्ये भेट घेणार; भावाचा आज टाॅवरवर चढून न्यायासाठी टाहो
मनोज जरांगे पाटील संतोष देशमुखांच्या कुटुबीयांची मस्साजोगमध्ये भेट घेणार; भावाचा आज टाॅवरवर चढून न्यायासाठी टाहो
Ratnagiri Bus Accident: रत्नागिरीच्या शेनाळे घाटात एसटीचा अपघात, बस दरीत घरंगळत जाऊन झाडाला अडकली, धरणात पडता पडता वाचली
रात्रीच्या किर्रर्रर्र अंधारात रत्नागिरीच्या शेनाळे घाटात एसटी बस दरीत कोसळली, झाड आडवं आल्याने अनर्थ टळला
कॅलिफोर्नियाच्या जंगलातील आगीत अडकली प्रीति झिंटा; सोशल मीडियावर अपडेट शेअर करत म्हणाली,
कॅलिफोर्नियाच्या जंगलातील आगीत अडकली प्रीति झिंटा; सोशल मीडियावर अपडेट शेअर करत म्हणाली, "हा भयानक अनुभव..."
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 13 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सNarayan Rane on Vaibhav Naik:सिंधुदुर्ग विमानतळाला टाळं मारलं तर तुझ्या घराला टाळं मारेन- नारायण राणेABP Majha Marathi News Headlines 8AM Headlines 08AM 13 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सNashik Dwarka Bridge Accident : द्वारका ब्रिजवर भीषण अपघात; तरुणांचा अपघातापूर्वीचा व्हिडीओ व्हायरल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident : लोखंडी वस्तू भरलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक, सळ्या तरुणांच्या शरीरातून आरपार ; नाशिकच्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा 8 वर
लोखंडी वस्तू भरलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक, सळ्या तरुणांच्या शरीरातून आरपार ; नाशिकच्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा 8 वर
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील संतोष देशमुखांच्या कुटुबीयांची मस्साजोगमध्ये भेट घेणार; भावाचा आज टाॅवरवर चढून न्यायासाठी टाहो
मनोज जरांगे पाटील संतोष देशमुखांच्या कुटुबीयांची मस्साजोगमध्ये भेट घेणार; भावाचा आज टाॅवरवर चढून न्यायासाठी टाहो
Ratnagiri Bus Accident: रत्नागिरीच्या शेनाळे घाटात एसटीचा अपघात, बस दरीत घरंगळत जाऊन झाडाला अडकली, धरणात पडता पडता वाचली
रात्रीच्या किर्रर्रर्र अंधारात रत्नागिरीच्या शेनाळे घाटात एसटी बस दरीत कोसळली, झाड आडवं आल्याने अनर्थ टळला
कॅलिफोर्नियाच्या जंगलातील आगीत अडकली प्रीति झिंटा; सोशल मीडियावर अपडेट शेअर करत म्हणाली,
कॅलिफोर्नियाच्या जंगलातील आगीत अडकली प्रीति झिंटा; सोशल मीडियावर अपडेट शेअर करत म्हणाली, "हा भयानक अनुभव..."
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांकडून 5 नक्षलवाद्यांचा खात्मा; ठार झालेल्यांमध्ये 2 महिला नक्षलींचा समावेश
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांकडून 5 नक्षलवाद्यांचा खात्मा; ठार झालेल्यांमध्ये 2 महिला नक्षलींचा समावेश
Buldhana Bald Virus : बुलढाण्यातील केस गळती, टक्कल प्रकरण; आरोग्य प्रशासनाचे हात रिकामेच, आता ICMR चेन्नई, दिल्लीचं पथक पाहाणी करणार
बुलढाणा केस गळती, टक्कल प्रकरण; आरोग्य प्रशासनाचे हात रिकामेच, आता ICMR चेन्नई, दिल्लीचं पथक पाहाणी करणार
किमान हमीभावासाठी एल्गार पुकारलेल्या शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवालांच्या आमरण उपोषणाचा 49 वा दिवस; हाडे आकुंचन पावू लागली
किमान हमीभावासाठी एल्गार पुकारलेल्या शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवालांच्या आमरण उपोषणाचा 49 वा दिवस; हाडे आकुंचन पावू लागली
14 गुन्हे पण 'मोका' नाहीच, वाल्मिक कराडची 13 दिवस कसून चौकशी, CID कोठडीतला मुक्काम उद्या लांबणार की..
14 गुन्हे पण 'मोका' नाहीच, वाल्मिक कराडची 13 दिवस कसून चौकशी, CID कोठडीतला मुक्काम उद्या लांबणार की..
Embed widget