Saif Ali Khan Surgery: सर्जरीनंतर सैफला रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज; अभिनेत्यानं चाहत्यांना दिली हेल्थ अपडेट, म्हणाला, "जर ही सर्जरी वेळेवर झाली नसती तर..."
Saif Ali Khan: मंगळवारी (23 जानेवारी) दुपारी सैफ अली खानला सर्जरीनंतर डिस्चार्ज देण्यात आला. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सैफनं त्याच्या हेल्थ अपडेटबद्दल सांगितलं.
Saif Ali Khan Surgery: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) याला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काल सैफच्या ट्रायसेपवर शस्त्रक्रिया झाली. सैफ हा त्याच्या आगामी 'देवारा' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अॅक्शन सीन करत होता. यामुळे सैफच्या हाताला दुखापत झाली. मंगळवारी (23 जानेवारी) दुपारी सैफ अली खानला सर्जरीनंतर डिस्चार्ज देण्यात आला. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सैफनं त्याच्या आरोग्याबाबत अपडेट दिली आहे.
सर्जरीनंतर सैफ अली खानला डिस्चार्ज मिळाला. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सैफ त्याच्या घरी परतला. फोटोग्राफर्सनं सैफला त्याच्या घराखाली स्पॉट केलं. यावेळी सैफचा हात कव्हर करण्यात आलेला दिसला. सैफसोबत यावेळी करिना देखील होती.
सैफनं दिली हेल्थ अपडेट
नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सैफनं त्याच्या हेल्थबाबत सांगितलं. तो म्हणाला, "देवारा' चित्रपटाच्या अॅक्शन सीक्वेन्सच्या शूटिंगच्या वेळी गंभीर दुखापत झाल्याने माझ्या ट्रायसेपमध्ये 'असह्य वेदना' झाल्या. मला वाटले की हे सर्व ठीक आहे, पण नंतर वर्क आऊट करताना वेदना वाढली, त्यामुळे मी एमआरआय करू घेतला. कारण जेव्हा मी माझ्या कुटुंबासोबत नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी गेलो होते तेव्हा देखील मला वेदना होत होत्या. मग आम्हाला आढळून आले की ट्रायसेप टेंडन फारच फाटलेला होता."
सैफ पुढे म्हणाला, "देवरा आणि इतर काही कमिटमेंट्सचा भाग पूर्ण केल्यानंतर मी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रियेच्या प्रक्रियेदरम्यानच डॉक्टरांच्या लक्षात आले की परिस्थिती खूपच गंभीर आहे. जेव्हा त्यांनी माझा हात पाहिला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की शस्त्रक्रियेची खूप गरज आहे. त्यांनी माझ्या हातामधील द्रव काढून टाकला, हाताची नर्व दुरुस्त केली. ते डॉक्टर विलक्षण होते, त्यांनी हाडात काही चीरे केले आणि नंतर शस्त्रक्रिया केली ज्यामुळे संपूर्ण हात पूर्णपणे चांगला झाला."
View this post on Instagram
सैफ म्हणाला, "सर्जरी वेळेवर झाली नसती तर..."
सैफ पुढे म्हणाला की, ही सर्जरी वेळेवर झाली आणि जर ही सर्जरी वेळेवर झाली नसती तर माझ्या हाताचा काही भाग मला गमवावा लागला असता. मी आता ठीक आहे. आता सर्व काही ठीक आहे. ही एक प्रकारची प्रीवेंटिव सर्जरी होती आणि ती योग्य वेळी झाली."
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Saif Ali Khan Admitted : अभिनेता सैफ अली खान रुग्णालयात दाखल