Pataudi Palace : 150 खोल्या, 100 नोकर; नवाब सैफ अली खानच्या पतौडी पॅलेसचा राजेशाही थाट
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानला (saif ali khan) पतौडीचा नवाब म्हणले जाते.
saif ali khan Pataudi Palace : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानला (saif ali khan) पतौडीचा नवाब म्हणले जाते. सैफ आणि अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor) यांच्या पतौडी पॅलेसची चर्चा नेहमी होत असते. या पॅलेसमध्ये काय काय आहे? या पॅलेसची किंमत काय? असे अनेक प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडतात. जाणून घेऊयात सैफच्या पतौडी पॅलेसबद्दल काही खास गोष्टी-
सैफचा पतौडी पॅलेस हा हरियाणामध्ये आहे.एका रिपोर्टनुसार पतौडी पॅलेसमध्ये 150 खोल्या आहेत. तसेच 100 नोकर या पॅलेसमध्ये काम करतात. पतौडी पॅलेसमध्ये वीर-जारा, मेरे ब्रदर की दुल्हन आणि मंगल पांडे या सुपर हिट चित्रपटांचे चित्रीकरण या पॅलेसमध्ये झाले आहे. तांडव या वेब सीरिजचे देखील शूटिंग या पॅलेसमध्ये झाले आहे.
पतौडी पॅलेस हा डिझाइन रॉबर्ट टोर रसेल यांनी डिझाइन केला आहे. रॉबर्ट टोर रसेल यांनी दिल्लीमधील कनॉट प्लेस देखील डिझाइन केले होते. हा पॅलेस इब्राहिम कोठी म्हणून देखील ओळखला जातो. पतौडी पॅलेसची किंमत 800 कोटींपेक्षा जास्त आहे.
View this post on Instagram
करीना आणि सैफ त्यांच्या कुटुंबासोबत अनेक समारंभ पतौडी पॅलेसमध्ये साजरे करतात. सैफ आणि अभिनेत्री करिना कपूर हे 'टशन' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडले. सैफने करिनासोबत 2012 मध्ये लग्न केले. 20 डिसेंबर 2016 रोजी सैफ आणि करिनाला मुलगा झाला त्याचं नाव त्यांनी तैमुर असे ठेवले. त्यानंतर करिना आणि सैफला दुसरा मुलगा झाला त्यांच नावं त्यांनी जहांगिर ठेवलं आहे.
करीनासोबत लग्न करण्याआधी सैफनं लिहिलं अमृताला पत्र; शोमध्ये केला होता गौप्यस्फोट