करीनासोबत लग्न करण्याआधी सैफनं लिहिलं अमृताला पत्र; शोमध्ये केला होता गौप्यस्फोट
सैफ आणि अमृता सिंहचा 2004 मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर सैफने 2012 मध्ये करिना कपूरसोबत लग्नगाठ बांधली.
Saif Ali Khan Marriage : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानने (Saif Ali Khan) अभिनेत्री करिना कपूरसोबत (Kareena Kapoor) 2012 साली लग्नगाठ बांधली. सैफ आणि अमृता सिंहचा (amrita singh) 2004 मध्ये घटस्फोट झाला. करिना आणि सैफच्या जोडीला चाहत्यांची नेहमी पसंती मिळते. त्यांच्या पर्सनल आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक असतात. चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरच्या (Karan Johar) 'कॉफी विथ करण' या प्रसिद्ध शोमध्ये सैफने करिना आणि त्याच्या लग्नाआधी अमृतासाठी लिहीलेल्या पत्राबाबत सांगितले होते.
कॉफी विथ करण या शोमध्ये वेगवेगळे बॉलिवूड सेलिब्रिटी हजेरी लावतात. या शोमध्ये येऊन कलाकार त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितात. सैफने देखील या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्याने करिनासोबत लग्न करण्याआधी अमृताला लिहीलेल्या पत्राबद्दल सांगितले होते. सैफने म्हणाला, 'अमृताला मी एक पत्र लिहिलं होतं. माझ्या आयुष्याच्या नव्या पर्वाबद्दल मी त्या पत्रामध्ये लिहीले होते. पत्र लिहून झाल्यानंतर मी ते करीनाला दाखवलं होतं. तिने ते पत्र वाचलं. तिला मी लिहीलेलं हे पत्र खूप आवडलं. त्यानंतर मी ते पत्र अमृताला पाठवलं होतं. '
View this post on Instagram
सैफ आणि अभिनेत्री करिना कपूर हे 'टशन' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडले. सैफने अभिनेत्री करिना कपूरसोबत 2012 साली लग्न केले. 20 डिसेंबर 2016 रोजी सैफ आणि करिनाला मुलगा झाला त्याचं नाव त्यांनी तैमुर असे ठेवले त्यानंतर करिना आणि सैफला दुसरा मुलगा झाला त्यांच नावं त्यांनी जहांगिर असं ठेवलं आहे. अनेक वेळा करिना आणि सैफ या दोघांना त्यांच्या मुलाच्या नावावरून ट्रोल केले जाते. काही दिवसांपूर्वी सैफचा भूत पोलिस हा चित्रपट प्रदर्शित झाला. तसेच त्याच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'बंटी और बबली-2' या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
Jersey Movie : 'जर्सी'ची स्क्रिप्ट वाचल्यानंतर शाहिदला अश्रू अनावर; भावूक करणारा अनुभव