एक्स्प्लोर

Sai Tamhankar Birthday : PG मध्ये राहण्याचं स्ट्रगल ते मुंबईत आलिशान घर घेण्यापर्यंतचा प्रवास; सई ताम्हणकरच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या या खास गोष्टी

Sai Tamhankar Birthday : बोल्ड अँन्ड ब्युटीफूल अभिनेत्री सई ताम्हणकरच्या वाढदिवसानिमित्त याखास गोष्टी जाणून घ्या.

Sai Tamhankar Birthday : उत्तम अभिनय जिद्द, चिकाटीच्या जोरावर मराठी सिनेसृष्टीच नाही, तर बॉलिवूडमध्येही स्वत:चं वेगळं अस्तित्व निर्माण केलेली अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. आज 25 जून रोजी सई ताम्हणकरचा 38 वा वाढदिवस आहे. छोट्या पडद्यावरुन सुरुवात करणारी सई तिच्या अभिनयाच्या जोरावर मोठ्या पडद्यारपर्यंत पोहोचली आहे. करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये मुंबईतल पीजीमध्ये राहण्याचं स्ट्रगल ते मुंबईत आलिशान घर घेण्यापर्यंतचा प्रवास सई ताम्हणकरने पूर्ण केला आहे. सईच्या वाढदिवसानिमित्त तिच्याबद्दलच्या खास गोष्टी जाणून घ्या.

टीव्ही ते मोठ्या पडद्यापर्यंतचा प्रवास

छोट्या पडद्यावरील या गोजिरवाण्या घरात या मालिकेपासून सईने अभिनय क्षेत्रातील करिअरची सुरुवात केली. त्यानंतर तिने कधी मागे वळून पाहिलं नाही. बोल्ड, ग्लॅमरस, बिनधास्त अशी सई ताम्हणकरची ओळख. छोट्या पडद्यावरुन तिने मोठ्या पडद्यावरही मोठ्या दिमाखात एन्ट्री मारली. सईच्या बोल्डनेसमुळे तिला अनेकदा टीकेलाही सामोरं जावं लागलं, पण सईने याचा परिणाम स्वत: वर होऊ दिला नाही आणि आपली वेगळी ओळख निर्माण केली. सई सध्या कोट्यवधींची मालकीण आहे.

स्टायलिश स्टार सई

सई ताम्हणकर फॅशन आयकॉन आहे. तिचा स्टायलिश लूक नेहमीच चर्चेत असतो. परफेक्ट साडी असो किंवा मग वेस्टर्न ड्रेस, सई प्रत्येक आऊटफिटमध्ये तितकी ग्लॅमरस दिसते.

PG मध्ये राहण्याचं स्ट्रगल ते मुंबईत आलिशान घर घेण्यापर्यंतचा प्रवास

सईने सुरुवातीच्या दिवसांमध्ये मुंबईत राहण्यासाठीही खूप संघर्ष केला. तिच्या स्ट्रगलिंगच्या काळात ती, मुंबईत पेइंग गेस्ट म्हणून राहिली. अनेक वर्ष ती पीजीमध्ये राहिली. मुंबईत एक घर असावं, अशी तिची सुरुवातीला साधी इच्छा होती. पण, अखेरीस 2023 मध्ये सईने मुंबईत स्वप्नातलं घर घेतलं. सईने तिच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की, तिने नवं घरं घेईपर्यंत 10 घरे बदलली होती. 

अवघ्या दोन वर्षात घटस्फोट

सईचं प्रोफेशनल लाईफप्रमाणे तिचं वैयक्तिक आयुष्य देखील खूपच चर्चेत राहीलं. करिअर सेट झाल्यानंतर सई ताम्हणकरने अमेय गोसावीसोबत लग्नगाठ बांधली. सई आणि अमेयची फ्रेंडच्या माध्यमातून मैत्री झाली आणि नंतर त्याचं प्रेमात रुपांतर. 2013 मध्ये दोघांनी लग्न केलं. पण, त्यांचं हे प्रेम फार काळ टिकलं नाही. यानंतर अवघ्या दोन वर्षांनी 2015 मध्ये सई आणि अमेय यांनी घटस्फोट घेतला.

सई ताम्हणकर या व्यक्तीला करतेय डेट

सई ताम्हणकर सध्या निर्माता अनिश जोगला डेट करत आहे. सई व अनिश दोघेही सध्या स्पेनमध्ये व्हेकेशन एंजॉय करत आहेत. खरं तर दोघांनी स्पेनधील वेगवेगळ्या ठिकाणचे फोटो शेअर केले होते, त्यामुळे ते एकत्र फिरायला गेल्याची चर्चा होती. पण आता अनिशने दोघांचाही एक फोटो शेअर करत याची पुष्टी केली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget