Rupali Bhosale : 'आई कुठे काय करते' मालिकेतील संजना रुग्णालयात दाखल; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिला सल्ला
Rupali Bhosale : 'आई कुठे काय करते' मालिकेतील संजना म्हणजेच रुपाली भोसलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Rupali Bhosale : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe kay Karte) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील सकारात्मक भूमिकेत असणाऱ्या कलाकारांसोबत नकारात्मक भूमिकेत असणाऱ्या कलाकारांनादेखील प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. आता या मालिकेतील संजना म्हणजेच रुपाली भोसले (Rupali Bhosale) रुग्णालयात दाखल झाली आहे.
रुपालीने रुग्णालयातील फोटो शेअर करत चाहत्यांना माहिती दिली आहे. रुपालीवर नुकतीच एक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तिने फोटो शेअर करत चाहत्यांना शरीराची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
फोटो शेअर करत रुपालीने लिहिलं आहे,"आयुष्यात अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. पण या गोष्टींचा हसत सामना करणं गरजेचे आहे. माझी एक छोटी सर्जरी झाली असून आता मी ठिक आहे. तुमच्या प्रेम आणि आशिर्वादाबद्दल मी आभारी आहे. शारीरिक त्रासाकडे दुर्लक्ष करू नका. शरीराची काळजी घेणं गरजेचं आहे".
View this post on Instagram
रुपालीवर ठाण्यातील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुपालीने शेअर केलेल्या फोटोवर चाहते तिला काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत. तसेच ती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत. रुपालीने पोस्टच्या माध्यमातून डॉक्टरांचेदेखील आभार मानले आहेत.
'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या पर्वामुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले. रुपाली छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या ती, ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेत संजना ही भूमिका साकारत आहे. मन उधाण वाऱ्याचे', 'कन्यादान' अशा अनेक मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.
संबंधित बातम्या