Ruhanika Dhawan: 15 व्या वर्षी आलिशान घर घेणाऱ्या रुहानिकाच्या पालकांवर नेटकऱ्यांनी केला बालमजुरीचा आरोप; अभिनेत्री म्हणाली, 'आता सर्व पैसे संपले...'
रुहानिकाच्या (Ruhanika Dhawan) पालकांना काही नेटकरी ट्रोल करत आहे. यावर रुहानिका आणि तिची आई डॉली यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Ruhanika Dhawan: अभिनेत्री रुहानिका धवन (Ruhanika Dhawan) ये है मोहब्बतें (Yeh Hai Mohabbatein) या मालिकेमुळे रुहानिकाला विशेष लोकप्रियता मिळाली. रुहानिकानं या मालिकेमध्ये रुही ही भूमिका साकारली. रुहानिकानं काही दिवसांपूर्वी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमध्ये रुहानिकानं तिनं खरेदी केलेल्या नव्या घराची माहिती दिली. रुहानिकाच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले होते. आता रुहानिकाच्या पालकांना काही नेटकरी ट्रोल करत आहे. यावर रुहानिका आणि तिची आई डॉली यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अनेक यूजर्सने रुहानिकाची आई डॉली धवन यांच्या मुलीवर दबाव आणून तिला वयापेक्षा जास्त काम करायला लावल्याचा आरोप केला. रुहानिकाकडून बालमजुरी करून घेण्याचा आरोप तिच्या पालकांवर काही नेटकऱ्यांनी केला. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत डॉली धवन यांनी सांगितले, कोणत्याही मुलांनी दबाव घेऊ नये. आम्ही रुहानिकावर कोणताही दबाव आणला आहे, ना तिच्याकडून कोणतेही अतिरिक्त काम करुन घेतले.
रुहानिकाची आई डॉली यांनी पुढे सांगितले की,'रुहानिकाच्या यशाचे कोणीही दडपण घेऊ नये. हे एका रात्रीत घडलेले नाही. या संपूर्ण प्रक्रियेत बराच वेळ गेला. आम्ही पैशाची योग्य बचत होईल, याकडे विशेष लक्ष दिले. या संपूर्ण प्रक्रियेला आठ वर्षे लागलीमी रुहानिकासाठी योग्य आर्थिक नियोजन केले. मी काही पैसे गुंतवले होते.'
ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांच्या कमेंट्सबाबत विचारल्यावर रुहानिका म्हणाली, 'मी अशा कमेंट्सकडे जास्त लक्ष देत नाही कारण मला माहित आहे की मी लक्ष दिले तर मी नाराज होईल. बालमजुरीचा प्रश्नच येत नाही. गेल्या चार-पाच वर्षांत मी एकही प्रोजेक्ट घेतलेला नाही. व्हिडिओ रेकॉर्ड करणे हा एक छंद आहे.'
2023 मध्ये काय खरेदी करणार? असा प्रश्न विचारल्यानंतर रुहानिकानं सांगितलं, 'मी प्रामाणिकपणे बोलत आहे, माझे पैसे संपले आहेत. गेल्या वर्षी, माझी आई आणि मी घर शोधत होतो. आम्हाला या घरापेक्षा जास्त चांगले घर मिळु शकत नाही. मला याचा आनंद आहे की, ज्या शहरात 1 BHK महाग असतो, त्या शहरात आम्ही घर घेतलं आहे.'
View this post on Instagram
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: