Ruhanika Dhawan: वयाच्या 15 व्या वर्षी अभिनेत्रीनं घेतलं आलिशान घर; पोस्ट शेअर करत म्हणाली, 'आईनं पैसे केले डबल..'
रुहानिकानं नुकतीच एक खास पोस्ट शेअर केली. रुहानिकानं तिच्या नव्या घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

Ruhanika Dhawan: रुहानिका धवन (Ruhanika Dhawan) ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ये है मोहब्बतें (Yeh Hai Mohabbatein) या मालिकेमुळे रुहानिकाला विशेष लोकप्रियता मिळाली. रुहानिकानं या मालिकेमध्ये रुही ही भूमिका साकारली. रुहानिका ही सोशल मीडियावर सक्रिय असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. रुहानिकानं नुकतीच एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमध्ये रुहानिकानं तिनं खरेदी केलेल्या नव्या घराची माहिती दिली. रुहानिकाच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.
रुहानिकाची पोस्ट:
रुहानिकानं तिच्या नव्या घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. हे फोटो शेअर करुन तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'देवाच्या कृपेनं, नवं घर खरेदी करण्याची माझी इच्छा पूर्ण झाली आहे. माझे पालक आणि मी, मला मिळालेल्या सर्व प्लॅटफॉर्म्स आणि संधींबद्दल पूर्ण आभारी आहोत. ज्यांनी मला हे स्वप्न पूर्ण करण्यात मदत केली आहे, त्यांचे देखील मी आभार मानते. माझ्या पालकांच्या मदतीशिवाय आणि मार्गदर्शनाशिवाय हे शक्य झाले नसते. मला ही पोस्ट लिहित असताना धन्य वाटते.'
या पोस्टच्या माध्यामातून रुहानिकानं तिच्या आईचे देखील आभार मानले. रुहानिकानं पोस्टमध्ये लिहिलं, 'माझ्या आईचा मी विशेष उल्लेख करते. ती जादूगार आहे. तिनं पैसे वाचवले आणि ते पैसे तिनं डबल केले. ती हे कसं करते हे फक्त देव आणि तिलाच माहीत. मी आता थांबणार नाही. ही फक्त सुरूवात आहे. मी मोठी स्वप्ने पाहत आहे, मी माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करेन. स्वप्न पहा, ते नक्कीच एक दिवस पूर्ण होईल.'
View this post on Instagram
रुहानिकाच्या पोस्टला काही नेटकऱ्यांनी आणि सेलिब्रिटींनी कमेंट्स करुन रुहानिकाला शुभेच्छा दिल्या आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Kaleidoscope : नेटफ्लिक्सचा 'कॅलिडोस्कोप' सत्य घटनेवर आधारित? जाणून घ्या...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
