Rucha Hasabnis : 'साथ निभाना साथिया' फेम रुचा हसबनीसने दिला मुलाला जन्म; सोशल मीडियावर शेअर केला बाळाचा फोटो
Rucha Hasabnis : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रुचा हसबनीसच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन झालं आहे.
![Rucha Hasabnis : 'साथ निभाना साथिया' फेम रुचा हसबनीसने दिला मुलाला जन्म; सोशल मीडियावर शेअर केला बाळाचा फोटो Rucha Hasabnis Saath Nibana Saathiya fame gave birth to a baby boy Baby photo shared on social media Rucha Hasabnis : 'साथ निभाना साथिया' फेम रुचा हसबनीसने दिला मुलाला जन्म; सोशल मीडियावर शेअर केला बाळाचा फोटो](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/08/570dc24c70582d823e3da6d1725bf25a1667873057643254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Rucha Hasabnis baby Boy : 'साथ निभाना साथिया' (Sath Nibhana Sathiya) या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेत राशीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुचा हसबनीस (Rucha Hasabnis) दुसऱ्यांदा आई झाली आहे. तिच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. सोशल मीडियावर बाळाचा फोटो शेअर करत तिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
रुचाने सोशल मीडियावर बाळाचा फोटो शेअर करत लिहिलं आहे,"हा गोडंस मुलगा आहे... फोटो खूपच कमाल आला आहे". आलिया पाठोपाठ रुचाने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. सोशल मीडियावर चाहते आणि सेलिब्रिटी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
View this post on Instagram
रुचाने दिली अनोख्या पद्धतीने गोड बातमी...
रुचाने दुसऱ्या प्रेग्नेंसीची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. तिने इन्स्टाग्राम पोस्टवर तिच्या मुलीचा पेंटिंग करतानाचा एक फोटो शेअर केला होता. त्या कॅनव्हासवर 'मोठी बहिण' असं लिहिलेलं दिसत होतं. रुचाने ही पोस्ट शेअर केल्यानंतर टीव्ही जगतातील अनेक सेलिब्रिटींनी तिला गुड न्यूजसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. 'साथ निभाना साथिया'ची राशी पुन्हा आई झाल्याने चाहत्यांना आनंद झाला आहे.
प्रेग्नेंसीदरम्यान रुचा वेगवेगळ्या प्रकारे मॅटर्निटी लीव्ह एन्जॉय करताना दिसली. बेबी बंपचे हटके फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. रुचा 2019 साली पहिल्यांदा आई झाली. लग्नानंतर रुचा अभिनय क्षेत्रापासून दुरावली. पण तरीही सोशल मीडियावर मात्र ती खूप सक्रिय आहे. रुचा 2015 साली राहुलसोबत लग्नबंधनात अडकली होती.
संबंधित बातम्या
'साथ निभाना साथिया'ची राशी पुन्हा होणार आई, दिली अनोख्या पद्धतीने गोड बातमी!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)