![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Rohit Shetty : प्रेक्षकांना खळखळून हसवायला येतोय 'Golmaal 5'; रोहित शेट्टीचा खास मास्टरप्लॅन! जाणून घ्या कधी रिलीज होणार चित्रपट
Golmaal 5 : रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) 'गोलमाल 5' या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
![Rohit Shetty : प्रेक्षकांना खळखळून हसवायला येतोय 'Golmaal 5'; रोहित शेट्टीचा खास मास्टरप्लॅन! जाणून घ्या कधी रिलीज होणार चित्रपट Rohit Shetty unveils his plans for Golmaal 5 says it has to be bigger and better Know Bollywood Entertainment Latest Update Rohit Shetty : प्रेक्षकांना खळखळून हसवायला येतोय 'Golmaal 5'; रोहित शेट्टीचा खास मास्टरप्लॅन! जाणून घ्या कधी रिलीज होणार चित्रपट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/18/236b34e43ee2663962033719273afcf31705562525594254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Rohit Shetty on Golmaal 5 : बॉलिवूडच्या लोकप्रिय सिने-दिग्दर्शकांमध्ये रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) समावेश होतो. आपल्या प्रत्येक सिनेमाच्या माध्यमातून काहीतरी वेगळं करण्याचा रोहितचा प्रयत्न असतो. हिंदी सिनेसृष्टीतील यशस्वी दिग्दर्शकांमध्ये रोहित एक आहे. त्याच्या सिनेमात अॅक्शन आणि नाट्य प्रेक्षकांना पाहायला मिळतं. 'इंडियन पोलीस फोर्स' या सीरिजच्या माध्यमातून ओटीटी विश्व गाजवण्यास रोहित सज्ज आहे. अशातच रोहित शेट्टीच्या बहुप्रतिक्षीत 'गोलमाल 5' (Golmaal 5) या सिनेमासंदर्भात नवी अपडेट समोर आली आहे.
रोहित शेट्टीचा मास्टरप्लॅन
रोहित शेट्टीने 'गोलमाल 5' या सिनेमाचा मास्टर प्लॅन बनवला आहे. पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत रोहित शेट्टी म्हणाला,"गोलमाल 5 नक्कीच बनवेल. हा सिनेमा मी थोडा लवकर बनवायला हवा. येत्या दोन वर्षात 'गोलमाल 5' प्रेक्षकांच्या भेटीला येईल. 'गोलमाल 5' हा नक्कीच भव्य सिनेमा असेल".
रोहित पुढे म्हणाला,"आजच्या काळात 'ऑल द बेस्ट' आणि 'गोलमाल' सारख्या सिनेमांची निर्मिती व्हायला हवी. अशा जॉनरचे सिनेमे पाहायला प्रेक्षकांना आवडतं. 'गोलमाल'चा मोठा चाहतावर्ग असून या चाहत्यांसाठी मी हा सिनेमा बनवत आहे. 'गोलमाल 5' हा विनोदीपट असला तरी भव्यदिव्य असायला हवा".
View this post on Instagram
रोहित शेट्टीचा 'इंडियन पोलीस फोर्स' कधी रिलीज होणार? (Indian Police Force)
रोहित शेट्टीच्या आगामी 'इंडियन पोलीस फोर्स' या सीरिजची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 19 जानेवारी 2024 रोजी ही सीरिज प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या सीरिजच्या माध्यमातून रोहित शेट्टी ओटीटी विश्वास पदार्पण करणार आहे. 'इंडियन पोलीस फोर्स'मध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबेरॉय, श्वेता तिवारी, निकितिन धीर, ऋतुराज सिंह, मुकेश ऋषी आणि ललित परिमू हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. 'इंडियन पोलीस फोर्स' या वेबसिरिजमध्ये प्रेक्षकांना अॅक्शन पाहायला मिळणार आहे. इंडियन पोलीस फोर्स ही दिल्लीतील ती पोलीसांची गोष्ट आहे.
'सिम्बा','सूर्यवंशी','सिंघम','चेन्नई एक्सप्रेस' अशा अनेक सुपरहिट सिनेमांच्या दिग्दर्शनाची धुरा रोहित शेट्टीने सांभाळली आहे. आता चाहत्यांना रोहितच्या आगामी 'गोलमाल 5'ची प्रतीक्षा आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
संबंधित बातम्या
Indian Police Force Trailer : 'इंडियन पोलीस फोर्स' वेबसिरिजचा ट्रेलर आऊट, ॲक्शनचा तडका पाहायला मिळणार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)