एक्स्प्लोर

Bollywood Kissa : ऋषी कपूरसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीनं केली चार लग्न, सूपरहिट चित्रपट दिल्यानंतरही करियर फ्लॉप, 33 वर्षांपासून अज्ञातवासात

Bollywood Kissa : अभिनेत्री झेबा बख्तियारला 1991 मध्ये आलेल्या 'हिना' या डेब्यू चित्रपटातून मोठी ओळख मिळाली.

Bollywood Kissa : फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप मेहनत केल्यानंतर धक्के खाल्ल्यानंतर अनेक सेलिब्रिटींना ओळख आणि प्रसिद्धी मिळते. बॉलिवूडमध्ये असे खूप कमी स्टार्स आहेत ज्यांना पदार्पण होताच ओळख मिळाली आहे. अनेक सेलिब्रिटींना इंडस्ट्रीत वर्षानुवर्षे संघर्ष केल्यानंतरही हवी ती ओळख आणि स्टारडम मिळत नाही. सूपरहिट ठरलेल्या हिना चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेली अभिनेत्री झेबा बख्तियार रातोरात स्टार बनली. अभिनेत्री झेबा बख्तियारला 1991 मध्ये आलेल्या 'हिना' या डेब्यू चित्रपटातून मोठी ओळख मिळाली.

ऋषी कपूरसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीनं केली चार लग्न

अभिनेत्री झेबा बख्तियारने (Zeba Bakhtiar) 1991 मध्ये ऋषी कपूर यांच्या 'हिना' या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. याआधी राज कपूरने त्यांना एका शोमध्ये पाहिले होते आणि त्यांना चित्रपटात संधी देण्याचं ठरवलं. पण ब्लॉकबस्टर पदार्पणानंतरही अभिनेत्रीला ती ओळख मिळाली नाही.

सूपरहिट चित्रपट दिल्यानंतरही करियर फ्लॉप

1991 मध्ये आलेल्या 'हिना' या सुपरहिट चित्रपटात ऋषी कपूरसोबत काम करणारी पाकिस्तानी अभिनेत्री झेबा बख्तियारने पदार्पण करताच लोकांची मने जिंकली. हिना चित्रपटातील तिच्या भूमिकेची छाप आजही चाहत्यांच्या मनामध्ये कायम आहे. 'हिना' हा झेबाचा पहिला चित्रपट होता आणि हिना सुपरहिट होताच झेबा रातोरात सुपरस्टार बनली. या चित्रपटानंतर झेबाने इतर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र, हिना चित्रपटातून जी प्रसिद्धी झेबाला मिळाली, ती परत मिळू शकली नाही.

छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंतचा प्रवास

हिना चित्रपटानंतर झेबा बख्तियारने मोहब्बत की आरजू, स्टंटमॅन, जय विक्रांता, सरगम, मुकदमा, चीफ साहिब आणि बिन रोये यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. झेबा बख्तियारने टीव्हीवरल अनारकली मालिकेशिवाय तानसेन, लगा, मुलाकत, मुकद्दस, मेहमान, मसूरी, दूरदेश, समझौता एक्सप्रेस, हजार साल आणि पहली सी मोहब्बत या शोमध्ये काम केलं आहे.

झेबा बख्तियार आता कुठे आहे?

पहिल्याच चित्रपटाने खळबळ माजवणारी झेबा बख्तियार आता कुठे आहे आणि काय करत आहे हे कोणालाच माहीत नाही. झेबाचे खरं नाव शाहीन होतं. झेबा ही पाकिस्तानी राजकारणी आणि माजी ॲटर्नी जनरल याह्या बख्तियार यांची मुलगी आहे. झेबाने पाकिस्तानमधील छोट्या पडद्यापासून आपल्या करिअरची सुरुवात केली आणि 1988 मध्ये टीव्ही सीरियल अनारकलीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. या शोमधील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. राज कपूरने त्याला या शोमध्ये पाहिलं आणि हिना चित्रपटात कास्ट केलं.

पहिला चित्रपट ब्लॉकबस्टर

या चित्रपटात झेबाने ऋषी कपूर यांच्यासोबत काम केलं. हिना चित्रपटात अश्विनी भावे मुख्य भूमिकेत दिसली होती. पण, इंडस्ट्रीमध्ये पर्दापण केलेल्या झेबाची तेव्हा खूप चर्चा झाली होती. झेबाचा हा पहिलाच चित्रपट होता आणि तो ब्लॉकबस्टरही ठरला, पण त्यानंतर तिचा एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करु शकला नाही.

33 वर्षांपासून अज्ञातवासात आहे अभिनेत्री

अभिनेत्री झेबा बख्तियानने चार लग्ने केली आहेत. तिचं पहिलं लग्न क्वेट्टा येथील सलमान वल्लियानी याच्याशी झालं. दुसरं लग्न अभिनेता जावेद जाफरीसोबत तिसरं लग्न गायक अदनान सामी आणि चौथे सोहेल खान लेघारी यांच्याशी झाले होतं. सध्या ती पाकिस्तानात राहते असं सांगितलं जातं. हिना चित्रपटानंतर तिला पुन्हा यश मिळालं नाही. ही अभिनेत्री अनेक वर्षांपासून अज्ञातवासात आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss 18 : सलमान खानकडून शूटींगला सुरुवात, बिग बॉस 18 मध्ये 'हे' 14 स्पर्धक सहभागी होणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतंAjit Pawar Akole Speech : तिजोरीची चावी माझ्या हातात.. अकोल्यात अजितदादांची टोलेबाजीABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Embed widget