(Source: ECI/ABP News/ABP Majha)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुपात दिसला 'कांतारा' स्टार ऋषभ शेट्टी; गर्वानं भारावून टाकणारा आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक आऊट
Rishab Shetty Fisrt Look Out From Pride Of Bharat: ऋषभ शेट्टीच्या आगामी चित्रपटाचं नाव आहे, 'द प्राईड ऑफ भारत : छत्रपती शिवाजी महाराज'. मेकर्सनी या चित्रपटाचं शानदार पोस्टर शेअर केलं आहे.
Rishab Shetty Fisrt Look Out From Pride Of Bharat: 'कांतारा'मुळे (Kantara) फक्त देशभरातच नाहीतर, संपूर्ण जगभरात नावाजलेला अभिनेता ऋषभ शेट्टी (Rishab Shetty) सध्या चर्चेत आहे. पण, कांतारा पार्ट 2 (Kantara Part 2) मुळे नाहीतर, त्याच्या आगामी नव्या चित्रपटामुळे. सध्या सोशल मीडियावर (Social Media) ऋषभ शेट्टीच्या अपकमिंग फिल्मचं पोस्टर व्हायरल होत आहे. या पोस्टरमध्ये ऋषभ शेट्टी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुपात दिसत आहे. चित्रपटाचं नाव आहे, 'द प्राईड ऑफ भारत : छत्रपती शिवाजी महाराज'. या चित्रपटाचं दिग्दर्शन संदीप सिंह करत आहेत. मेकर्सनी या चित्रपटाचं शानदार पोस्टर शेअर केलं आहे. तसेच, फिल्मची रिलीज डेट आणि इतर डिटेल अनाउंस केल्या आहेत.
राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता ऋषभ शेट्टी आणि दिग्गज दिग्दर्शक संदीप सिंह यांनी भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिल्या गेलेल्या मराठांच्या राजाची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर साकारण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा दोघे मिळून मोठ्या पडद्यावर साकारणार आहेत. याची पहिली झलक त्यांना प्रेक्षकांसाठी रिलीज केली आहे. चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं असून त्यामध्ये ऋषभ शेट्टी शिवरायांच्या भूमिकेत दिसून येत आहे. ऋषभनं त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यानं आपल्या चित्रपटाचा फर्स्ट लूकही शेअर केला आहे.
View this post on Instagram
ऋषभ शेट्टीनं आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं आहे की, आपला सन्मान आणि विशेषाधिकार, भारताचा महान योद्धा राजाची महाकाव्य गाथा प्रस्तुत करतोय... द प्राइड ऑफ भारत: छत्रपति शिवाजी महाराज. हा फक्त एक चित्रपट नाहीतर, एका योद्धाच्या सन्मानार्थ एक लढाईचा युद्धघोष आहे, ज्यानं सर्व अडचणींविरुद्ध लढा दिला, बलाढ्य मुघल साम्राज्याच्या सामर्थ्याला आव्हान दिलं आणि कधीही न विसरता येणारा वारसा निर्माण केला. हा चित्रपट 27 जानेवारी रोजी संपूर्ण जगभरात प्रसिद्ध होणार आहे.
दरम्यान, ऋषभ शेट्टीच्या आगामी चित्रपटाचं दिग्दर्शन संदीप सिंह करत आहे. यापूर्वी त्यांनी मैरी कॉम, सरबजीत, वीर सावरकर, रामलीला, सरबजीत यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. आता ते ऋषभ शेट्टीसोबत काम करणार आहे. पोस्टर पाहून चाहते भलतेच खूष झाले असून छत्रपती शिवरायांची भूमिका साकारताना ऋषभला पाहण्यासाठी उत्सुक आहेत. पण, त्यासाठी चाहत्यांना वाट पाहावी लागणार आहे. कारण पोस्टरसोबतच चित्रपट रिलीजची तारीखही सांगितली आहे. 21 जानेवारी 2027 रोजी संपूर्ण जगभरात रिलीज केला जाणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :