News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट
X

रिंकू राजगुरुच्या 'कागर' चित्रपटाचा टीझर लाँच

कागरच्या टीझरमधून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटात रिंकूची भूमिका काय असेल, याबाबत चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

FOLLOW US: 
Share:
मुंबई : 'सैराट' चित्रपटातून पदार्पण करणारी अभिनेत्री रिंकू राजगुरुचा आगामी चित्रपट 'कागर'चा टीझर लाँच झाला आहे. या चित्रपटात रिंकूसोबत अभिनेता शुभांकर तावडे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. कागरच्या टीझरमधून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटात रिंकूची भूमिका काय असेल, याबाबत चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. सैराटमधील आर्ची फक्त महाराष्ट्रातच नाही, तर देशभरात लोकप्रिय झाली होती. त्यानंतर रिंकूनचे 'सैराट'च्या कन्नड व्हर्जनमध्ये भूमिका केली, मात्र मराठीतला हा तिचा दुसराच सिनेमा आहे. कागर चित्रपटात शशांक शेंड्ये, भारती पाटील यांच्याही भूमिका आहेत. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा मकरंद माने यांच्या खांद्यावर आहे. कागर येत्या 26 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. टीझर पाहता हा सैराटप्रमाणेच प्रेमकथा आणि राजकीय पार्श्वभूमी असलेला चित्रपट वाटतो.
...म्हणून रिंकूच्या 'कागर'साठी आणखी वाट पाहावी लागणार!
हा सिनेमा 14 फेब्रुवारीच्या मुहूर्तावर प्रदर्शित केला जाणार होता. मात्र रिंकूच्या बारावीच्या परीक्षेमुळे तारीख पुढे ढकलण्यात आली. त्यातच 26 तारखेला 'मार्व्हल : अॅव्हेंजर एंडगेम' हा चित्रपटही प्रदर्शित होणार असल्यामुळे प्रेक्षकांनी प्रदर्शनाची तारीख बदलण्याची मागणी केली आहे. VIDEO | कागर चित्रपटाचा टीझर पाहा
Published at : 01 Apr 2019 11:57 PM (IST) Tags: Rinku Rajguru Marathi breaking news ABP Majha Latest Updates Marathi live News latest news Marathi News Maharashtra

आणखी महत्वाच्या बातम्या

Dilip Joshi  on Marathi Actors: 'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम

Dilip Joshi on Marathi Actors: 'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम

Ravi Kishan gets Trolled: 'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Ravi Kishan gets Trolled: 'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Kangana Ranaut Hits Back at Trolls: कंगना रनौतचा ट्रोलर्सना पुन्हा पलटवार; सिनेमातील क्लिप्स व्हायरल करणाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाली...

Kangana Ranaut Hits Back at Trolls: कंगना रनौतचा ट्रोलर्सना पुन्हा पलटवार; सिनेमातील क्लिप्स व्हायरल करणाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाली...

Raj Thackeray on Bollywood: मोदींचं कौतुक करणारे अभिनेते विवेक ओबेरॉय, आर. माधवन दुबईला का शिफ्ट झाले? राज ठाकरेंचे खडे सवाल

Raj Thackeray on Bollywood: मोदींचं कौतुक करणारे अभिनेते विवेक ओबेरॉय, आर. माधवन दुबईला का शिफ्ट झाले? राज ठाकरेंचे खडे सवाल

Rashmika Mandanna: रश्मिकाच्या चाहत्यांना धक्का; सेटवर झाली गंभीर दुखापत, हिप टेंडन तुटल्याची चर्चा, डॉक्टर म्हणाले, 6 आठवडे तरी....

Rashmika Mandanna: रश्मिकाच्या चाहत्यांना धक्का; सेटवर झाली गंभीर दुखापत, हिप टेंडन तुटल्याची चर्चा, डॉक्टर म्हणाले, 6 आठवडे तरी....

टॉप न्यूज़

Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं

Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं

Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं

Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं

Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम

Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम

राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे

राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे