Richa Chadha Daughter : रिचा चढ्ढा अन् अली फजलने मुलीचं नामकरण, युनिक अरबी नावाचा अर्थ माहितीय?
Richa Chadha Ali Fazal Daughter Name : अभिनेत्री रिचा चढ्ढा आणि अली फजलच्या लेकीनं नामकरण झालं असून त्यांनी सोशल मीडियावर चिमुकलीच्या नावाची घोषणा केली आहे.

Richa Chadha Ali Fazal Daughter Name : बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा आणि अभिनेत्री अली फजल यांनी काही महिन्यांपूर्वी त्याच्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं. रिचा आणि अली 16 जुलै रोजी चिमुकलीचे आई-वडील झाले. आता तब्बल 4 महिन्यांनंतर या जोडप्याने त्यांच्या मुलीचं नाव उघड केलं आहे. रिचा आणि अलीने त्यांच्या राजकुमारीचे नाव जुनेरा इदा फजल ठेवलं आहे. व्होग इंडियाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान या कपलने त्यांच्या बाळाचं नावं चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. यावेळी त्यांनी 'झुनेरा' नावाचा अर्थही सांगितला असून त्याचा अर्थ खूप खास आहे.
रिचा चढ्ढा अन् अली फजलने मुलीचं नामकरण
अलीकडेच, या कपलने चिमुकलीचं स्वागत केलं आहे. दोघेही त्यांच्या राजकुमारीसोबत खूप वेळ घालवत आई-बाबा होण्याचा आनंद घेताना दिसत आहेत. अली आणि रिचा यांनीदेखील अद्याप आपल्या मुलीचा चेहरा चाहत्यांना दाखवलेला नाही. पण, या कपलने अलीकडेच आपल्या मुलीचं नाव चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. त्यांच्या चिमुकलीचं नाव खूपच गोंडस आणि सुंदर नाव आहे. अरबी भाषेतील या नावाचा अर्थ काय आहे, जाणून घ्या.
युनिक अरबी नावाचा अर्थ माहितीय?
बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा आणि अली फजल सध्या पॅरेंटहूडचा आनंद घेत आहेत. पॅरेंटहूडच्या अनुभवाबद्दल बोलताना या जोडप्याने सांगितलं की, 'मूल होण्याने एक पोकळी भरून निघते ज्याबद्दल तुम्हाला आधी माहितीही नसतं. या विचाराने मी नेहमी आश्चर्यचकित होतो आणि हा विचार थांबत नाही.
View this post on Instagram
'मुल होण्याने पोकळी भरून येते'
रिचा चड्ढा आणि अली फजल यांनी 16 जुलै 2024 रोजी त्यांच्या पहिल्या मुलीचं स्वागत केलं, त्यानंतर दोघांनी ही बातमी सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना गूड न्यूज दिली होती. आता पुन्हा एकदा दोघांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलीच्या नामकरणाची बातमी दिली आहे. या कपलने मुलीचं नाव जुनैरा इदा फजल ठेवल्याचं सांगितलं आहे. वोगला दिलेल्या एका मुलाखतीत रिचा आणि अलीने मुलीचं नाव आणि त्याचा अर्थ सांगितला आहे.
View this post on Instagram
जुनैरा नावाचा अर्थ काय? जाणून घ्या
जुनैरा हे नाव अरबी शब्द आहे. जुनैरा शब्दाचा अर्थ 'मार्गदर्शक प्रकाश' आहे. इंग्रजीत या शब्दाचा अर्थ 'फ्लॉवर ऑफ पॅराडाइज' असा आहे. अली आणि रिचाच्या चाहत्यांना मुलीचं हे नाव खूप आवडलं आहे आणि चाहते ऋचा चढ्ढा आणि अली फजलचे खूप कौतुक करत त्यांना शुभेच्छा देत आहेत. एका यूजरने लिहिलं, 'हे खूप चांगलं नाव आहे.' दुसऱ्या यूजरने लिहिलं की, 'या नावाचा अर्थ खूप खोल आहे.'
महत्त्वाच्या इतर बातम्या :























