Rhea Kapoor : रीया कपूरने शेअर केली सोनम कपूरच्या बाळाची पहिली झलक; मावशीला अश्रू अनावर
Rhea Kapoor : सोनम कपूरने गोंडस बाळाला जन्म दिल्याने रीया कपूरला अश्रू अनावर झाले आहेत.

Rhea Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) आणि आनंद आहुजा (Anand Ahuja) नुकतेच आई-बाबा झाले आहेत. त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाल्याने चाहत्यांसह कुटुंबियांना आनंद झाला आहे. बाळाच्या मावशीने म्हणजेच रीया कपूरने (Rhea Kapoor) बाळाची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. फोटोत बाळाला पाहिल्यानंतर मावशीला अश्रू अनावर झाल्याचे दिसून येत आहे.
बाळाचा फोटो शेअर करत रीया कपूरने लिहिलं आहे,"बाळाला पाहून रीया मावशीला खूपच आनंद झाला आहे. बाळ खूपच गोंडस आहे. बाळासोबत वेळ घालवायला मला आवडत आहे. सोनम आणि आनंद दोघांचंही अभिनंदन. रीया कपूरने रुग्णालयातील बाळाचे फोटो शेअर केले आहेत. सोशल मीडियावर हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.
View this post on Instagram
खास पोस्ट शेअर करत सोनमने चाहत्यांना दिली गुड न्यूज
सोनम कपूरने खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. तिने लिहिलं आहे,"आज 20 ऑगस्ट 2022 रोजी आम्ही आमच्या लहान बाळाला जन्म दिला. आमच्या या प्रवासात आमच्यामागे खंबीरपणे उभे असणारे डॉक्टर्स, नर्स, मित्र-परिवार आणि कुटुंबियांचे मी आणि आनंद आम्ही मनापासून आभार मानतो. नवीन प्रवासाला आजपासून सुरुवात झाली आहे. यामुळे आमचं आयुष्य बदललं आहे".
सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव
सोशल मीडियावर सोनम कपूरच्या प्रेग्नंसीबद्दल अनेच चर्चा रंगत होत्या. सोनमला मुलगा होणार की मुलगी? याबाबत तिच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. आणि आता अखेर सोनमने ही गुड न्यूज दिली आहे. त्यामुळे तिला सोशल मीडियावर चाहत्यांकडून तसेच जवळच्या मित्र परिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.
संबंधित बातम्या























