एक्स्प्लोर

Rhea Chakraborty Interview | सुशांतची आईही डिप्रेशनमध्ये होती; रिया चक्रवर्तीचा खळबळजनक खुलासा

सुशांतच्या मृत्यूनंतर रियाने पहिल्यांदाच आपलं मौन सोडलं असून या प्रकरणात तिच्यावर करण्यात आलेल्या आरोपांचं स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच तिने अनेक धक्कादायक खुलासेही केले आहेत.

मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी रिया चक्रवर्तीने पहिल्यांदाच मीडियासमोर आपली बाजू मांडली आहे. तिने एखा खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना याप्रकरणातील आपली बाजू मांडली आहे. सुशांत मृत्यूपूर्वीअनेक दिवस डिप्रेशनमध्ये असल्याचं बोललं जात होतं. रियाने मुलाखती बोलताना सुशांत आणि त्याच्या डिप्रेशनबाबत अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत. रियाने सुशांत डिप्रेशनमध्ये होताच, पण त्याची आईदेखील मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचं सांगितलं आहे. तसेच मानसिक आजारामुळेच सुशांतच्या आईचा मृत्यू झाल्याचा रियाने दावा केला आहे.

रिया मुलाखतीत बोलताना म्हणाली की, सुशांतचं आपल्या आईवर फार प्रेम होतं आणि तो त्यांची नेहमी आठवण काढायचा. रियाने यावेळी सुशांतच्या वडिलांबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा केला आहे. रियाने सांगितल्यानुसार, सुशांतचे त्याचे वडिल के. के. सिंह यांच्यासोबत फारसे चांगले संबंध नव्हते. कारण त्याचे वडिल फार पूर्वीच त्याच्या आईला सोडून गेले होते. रियाने हेदेखील सांगितलं की, त्यांची आईदेखील कथित रित्या डिप्रेशनची शिकार होती. त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला.'

पाहा व्हिडीओ : सुशांत ड्रग्ज घ्यायचा, मी कधीही ड्रग्ज घेतलं नाही, रियाची कबुली

2016 पर्यंत डिप्रेशनमध्ये नव्हता सुशांत

रियाने पुढे सांगितलं की, 'सुशांतचं त्याच्या वडिलांशी नातं फारसं चांगलं नव्हतं. त्यामुळेच तो जवळपास 5 वर्ष आपल्या वडिलांना भेटला नव्हता. रियाच्या इंटरव्ह्यूवर सुशांतची एक्स-गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने रिअॅक्शन दिली आहे. ती म्हणाली की, '2016 पर्यंत सुशांत अजिबात डिप्रेशनमध्ये नव्हता. मी त्याच्या कुटुंबियांसोबत उभी आहे.' अंकिताने आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, 'सुरुवातीपासून शेवटपर्यंत, जोपर्यंत सुशांत आणि मी एकत्र होतो, 23 फेब्रुवारी 2016 पर्यंत. त्याला कोणत्याच प्रकारचं डिप्रेशन नव्हतं आणि त्याने डॉक्टरांशीही संपर्क साधला नव्हता. तो पूर्णपणे ठिक होता.'

सुशांतची बहिण श्वेता सिंहची प्रतिक्रिया

रियाच्या या वक्तव्यानंतर कुटुंबियांसोबतच्या संबंधांबाबत बोलताना सुशांतची बहिण श्वेता सिंहने किर्तीनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली की, 'कुटुंबातील सर्वच व्यक्ती सुशांतवर प्रेम करत होत्या. सुशांतचंही सर्वांवर खूप प्रेम होतं.' तिने ट्वीट करत म्हटलं की, 'सुशांतवर प्रेम होतं म्हणूनच त्याला बरं नसल्याचं समजताच मी त्याला भेटण्यासाठी अमेरिकेहून भारतात आले होते.'

महत्त्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majhi Ladki Bahin Yojana Form | माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा? A To Z प्रोसेसWorli Hit and Run Case : मासे घेऊन घरी येत असताना पत्नीला उडवलं, हुंदका आवरत पतीचा आक्रोशWorli Hit and Run Accident : वरळी अपघातातील गाडीचं परीक्षण करण्यासाठी RTO टीम दाखलSupriya Sule Meet Asha Pawar | अजित पवारांच्या घरी नाहीतर आशा काकींच्या घरी गेले होते- सुप्रिया सुळे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
Embed widget