एक्स्प्लोर

द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर : आहे मनमोहन तरी..

चित्रपटाच्या शेवटी राहुल गांधी यांचीही मुद्दाम खिल्ली उडवण्यात आली आहे. भाजपप्रणित सरकार सत्तेवर आल्यानंतर यूपीए सरकारवर मारण्यात आलेले ताशेरेही यात दाखवण्यात आले आहेत. यातून हा चित्रपट कादंबरीपुरता न उरता त्यातून छुपा अजेंडा पेरला जातोय की काय असं वाटू लागतं.

संजय बारु यांच्या कादंबरीवर हा सिनेमा बेतला आहे. या कादंबरीचं नावही तेच आहे, द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर. आणखी एका बायोपिकची भर या निमित्ताने सिनेजगतात पडली आहे. म्हणजे, हा तसा चरित्रपट नव्हे. 2004 मध्ये यूपीए सरकार सत्तेवर आल्यानंतर सोनिया गांधी यांनी मनमोहन सिंह यांच्या नावाची घोषणा पंतप्रधान म्हणून केली. त्यानंतर हा अर्थतज्ज्ञ पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर विराजमान झाला. अत्यंत मितभाषी, अजातशत्रू असलेल्या सिंह यांना राजकारणाने कसं शिकवलं, त्यांच्यावर कसे ताणतणाव आले. आदीचा लेखाजोखा या कादंबरीत आणि पर्यायाने या सिनेमात मांडण्यात आला आहे. मनमोहन सिंह पंतप्रधान असताना त्यांचे माध्यम सल्लागार म्हणून काम पाहिलं ते संजय बारु यांनी. संजय बारु यांनी त्यांच्या कारकीर्दीत मनमोहन यांना अत्यंत जवळून पाहिलं. त्यानंतर त्यांच्या व्यक्तिमत्वावर त्यांनी ही कादंबरी लिहिली आहे. साहजिक आहे, चित्रपट संजय आणि मनमोहन सिंह याच्याच भवती फिरतो. चित्रपटात अनेक मातब्बर कलाकार आहेत. त्यांची भूमिका निवडही चोख आहे. त्यामुळे हा चित्रपट मोहक आहे. पण अनेक प्रसंगांच्या अलिकडचा आणि पलिकडचा तपशील सिनेमात सापडत नाही. शिवाय बऱ्याचदा हा चित्रपट डॉक्युड्रामा होतो. सिनेमातल्या व्यक्तिरेखा जाऊन तिथे वास्तव जीवनातली माणसं अवतरतात. त्यामुळे हा सगळा प्रकार घिसाडघाईचा होतो. म्हणूनच चित्रपटावरची पकड सुटते आणि सिनेमा बनवण्याच्या हेतूवर शंका निर्माण होते.
अभिनेता अनुपम खेर यांची अभिनय कारकीर्द मोठी आहे. सारांशसारखा आपला पहिलाच सिनेमा करताना त्यांनी कमाल केली होती. पुढे आपल्या प्रत्येक चित्रपटात भूमिका करताना, त्या भूमिकेचा आवाका त्यांनी समजून घेतला. अर्थात सारांशसारखी भूमिका पुन्हा पुन्हा वाट्याला येण्यासाठी नटाला वाट पाहावी लागते. तोवर पदरी पडलेल्या भूमिका निभवाव्या लागतात. बऱ्याच वर्षांनी खेर यांच्या वाट्याला अशीच एक मोठी भूमिका आली आहे ती या चित्रपटाच्या निमित्ताने. द अक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या डॉक्टर मनमोहन सिंह यांच्यावर बेतलेल्या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका खेर यांच्या पदरी पडली आणि आता हा अभ्यासू नट त्याचं सोनं कसं करतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. ही उत्सुकता वाढत असतानाच सिनेमाचा ट्रेलर आला आणि तर्क वितर्काला ऊत आला. काहींना वाटलं डॉ. सिंह यांची यात चेष्टा केली गेली आहे. काहींना तो भाजपचा डाव वाटला तर या चित्रपटातून सोनिया गांधी यांना खलनायिका बनवण्याचा घाट घालण्यात आल्याचा वास काहींना आला. या सगळ्या शंकांमधून आज हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्याल गांधी घराणं आणि त्यांच्या भवतालची मंडळी, यात अहमद पटेल, नविन पटनायक, सीताराम येचुरी, कपिल सिब्बल, लालकृष्ण अडवाणी, अटलबिहारी वाजपेयी, सोमनाथ चॅटर्जी, पृथ्वीराज चव्हाण अशी बरीच मंडळी दिसतात. त्या सगळ्यांच कास्टिंग कमाल झालं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या भूमिकेत रमेश भाटकर झळकले आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने पंतप्रधानांच्या भवताली कशी सिस्टिम असते, पीएमओ कार्यालय नेमकं काय करतं, अंतर्गत कलह कसे सुरु असतात हे सगळं दिसतं. पण ते दिसत असताना पंतप्रधान म्हणून मनमोहन सिह काय विचार करत होते, एकेकाळी मनमोहन सिंह यांचं नाव सुचवणाऱ्या सोनिया यांचं आणि पंतप्रधानांचं कुठून बिनसायला सुरुवात झाली आदी अनेक गोष्टींचा थांग लागत नाही. नुसत्या वरवर गोष्टी येऊन जातात. त्यामुळे विनाकारण काही माणसं खलनायकी वाटतात. शिवाय चित्रपटाच्या शेवटी राहुल गांधी यांचीही मुद्दाम खिल्ली उडवण्यात आली आहे. भाजपप्रणित सरकार सत्तेवर आल्यानंतर यूपीए सरकारवर मारण्यात आलेले ताशेरेही यात दाखवण्यात आले आहेत. यातून हा चित्रपट कादंबरीपुरता न उरता त्यातून छुपा अजेंडा पेरला जातोय की काय असं वाटू लागतं.
एक नक्की की अनुपम खेर, अक्षय खन्ना आदी सर्वांनीच उत्तम कामं केली आहेत. पीएमओ ऑफिस आणि एकूणच पंतप्रधानांचं घर याची उभारणी नेटकी झाली आहे. डॉ. सिंह यांचा कस लागणारे अनेक प्रसंग यात दिसतात. पण सांगितलं तसं, एकूण कथा, पटकथा, त्याची मांडणी ही विषयाला धरुन असली तरी ती नेमकी नाही. त्यामुळे हा चित्रपट निराश करतो.
पिक्चर बिक्चरमध्ये म्हणूनच या चित्रपटाला मिळतात अडीच स्टार. हा चित्रपट पाहताना दिल्लीतला माहोल उभा राहतो. पण पडद्यावर दिसणारी माणसं अपवाद वगळता मनात नेमकी ठसत नाहीत. असो.
द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर : आहे मनमोहन तरी..
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget