एक्स्प्लोर

Republic Day 2023 आज 74 वा प्रजासत्ताक दिन; घरबसल्या ओटीटीवर पाहा 'हे' देशभक्तीपर चित्रपट

प्रजासत्ताक दिनाला (Republic Day) तुम्ही घरबसल्या ओटीटीवर देशभक्तीवर आधारित चित्रपट (Patriotic Movies) पाहू शकता. 

Republic Day 2023 : आज 74 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) आहे.  आज देशभरात प्रजासत्ताक दिनाचा  उत्साह पाहायला मिळत आहे. आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. देशभक्तीपर चित्रपटांना प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळत असते. प्रजासत्ताक दिनाला तुम्ही घरबसल्या ओटीटीवर देशभक्तीवर आधारित चित्रपट (Patriotic Movies) पाहू शकता.  या चित्रपटामधील काही सीन पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे येतात.

कोहराम (Kohram) 

1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या कोहराम या चित्रपटामध्ये प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटात अभिनेते नाना पाटेकर यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट तुम्ही युट्यूबवर पाहू शकता. 

अब तुम्हारे हवाले वतन साथियों (Ab Tumhare Hawale Watan Saathiyo)

अब तुम्हारे हवाले वतन साथियों या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाला  प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबतच अक्षय कुमार आणि बॉबी देओल यांनीही देखील महत्वाची भूमिका साकारली.  झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षक हा चित्रपट पाहू शकता. 

देश प्रेमी (Desh Premee)

1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या देश प्रेमी हा चित्रपट लोक आजही आवडीनं बघतात.   'मेरे देशप्रेमियों आपस में प्रेम करो' या देश प्रेमी चित्रपटातील गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी दुहेरी भूमिका साकारली आहे. हा चित्रपट तुम्ही झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. 

'मिशन मजनू'  (Mission Majnu) 

सिद्धार्थ मल्होत्राच्या 'मिशन मजनू'  या सिनेमाला सोशल मीडियावर संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. शंतनू बागचीने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात सिद्धार्थसह रश्मिका मंदान्ना महत्त्वाच्या भूमिकेत आहे. नेटफ्लिक्सवर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता. 

राझी (Raazi)

राझी या हा चित्रपट 2018 मध्ये रिलीज झाला.  या चित्रपटामध्ये आलिया भट्टनं एका सिक्रेट एजंटची भूमिका साकरली आहे. या चित्रपटामधील आलियाच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. हा चित्रपट प्राईम व्हिडीओवर प्रेक्षक पाहू शकतात. 

शेरशाह (Shershaah)

शेरशाह या चित्रपटामध्ये कॅप्टन विक्रम बत्रा ही भूमिका अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रानं साकारली आहे. या चित्रपटाचं कथानक कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित आहे. प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता.  

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Patriotic Movies : 'शेरशाह' ते 'चक दे इंडिया' ; 'या' चित्रपटामधील सीन पाहून येतील अंगावर शहारे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना PM मोदींच्या बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोदी महायुतीच्या आमदारांना भेटणार, पण धनंजय मुंडेंना बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं?
प्रवाशांवर भाडेवाढीची टांगती तलवार, एसटी पाठोपाठ टॅक्सी अन् ऑटोरिक्षा संघटनांची मागणी, नेमकी किती वाढ होणार?
मुंबईकरांना प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार, टॅक्सी अन् ऑटोरिक्षा संघटनांची भाडेवाढीची मागणी
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 15 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 630AM Headlines 630 AM 15 January 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्सMahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special ReportWalmik karad Macoca | वाल्मीक कराडवर मकोका, मुलासाठी आईची तळमळ, परळीत ठिय्या Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना PM मोदींच्या बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोदी महायुतीच्या आमदारांना भेटणार, पण धनंजय मुंडेंना बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं?
प्रवाशांवर भाडेवाढीची टांगती तलवार, एसटी पाठोपाठ टॅक्सी अन् ऑटोरिक्षा संघटनांची मागणी, नेमकी किती वाढ होणार?
मुंबईकरांना प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार, टॅक्सी अन् ऑटोरिक्षा संघटनांची भाडेवाढीची मागणी
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
Embed widget