एक्स्प्लोर
ज्येष्ठ सिनेनिर्माते राजकुमार बडजात्या यांचं निधन
ज्येष्ठ बॉलिवूड निर्माते राजकुमार बडजात्या यांचं निधन झालं आहे.
मुंबई : ज्येष्ठ बॉलिवूड निर्माते राजकुमार बडजात्या यांचं निधन झालं आहे. मुंबईतील सर एच एन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
राजश्री प्रॉडक्शनने आपल्या ऑफिशिअल हँडलवरुन ट्वीट करुन राजकुमार बडजात्या यांच्या निधनाची बातमी दिली. प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचे ते वडिल होते. राजश्री प्रॉडक्शनच्या माध्यमातून त्यांनी बॉलिवूडला दर्जेदार चित्रपटांची मेजवानीच दिली होता. 70, 80 आणि 90 च्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या चित्रपटांची निर्मिती राजश्री प्रॉडक्शनच्या माध्यमातून राजकुमार बडजात्या यांनी केली.
हम आपके है कौन, हम साथ साथ है, गीत गाता चल, मैने प्यार किया यासारखे दर्जेदार चित्रपट राजकुमार बडजात्या यांनी बनवले. सलमान खान आणि सोनम कपूर यांना घेऊन बनवलेला राम रतन धन पायो हा त्यांच्या कारकीर्दीतला शेवटचा सिनेमा ठरला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement