Bhirkit : गिरिश कुलकर्णींच्या 'भिरकीट' सिनेमातील ‘लाईन दे मला’ गाणं रिलीज; 17 जूनला सिनेमा होणार प्रदर्शित
Bhirkit : 'भिरकीट'ची संगीतमय मेजवानी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या सिनेमात गिरिश कुलकर्णी मुख्य भूमिकेत आहेत.
![Bhirkit : गिरिश कुलकर्णींच्या 'भिरकीट' सिनेमातील ‘लाईन दे मला’ गाणं रिलीज; 17 जूनला सिनेमा होणार प्रदर्शित Release of song Line De Mala from Girish Kulkarni movie Bhirkit The movie will be released on June 17 Bhirkit : गिरिश कुलकर्णींच्या 'भिरकीट' सिनेमातील ‘लाईन दे मला’ गाणं रिलीज; 17 जूनला सिनेमा होणार प्रदर्शित](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/22/b07e3748de46860b540ede06fea72d55_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bhirkit : 'भिरकीट' (Bhirkit) हा सिनेमा 17 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनुप जगदाळे यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. धमाल विनोदी आणि कौटुंबिक नाते यांच्या सोबतच या सिनेमात प्रेक्षकांना जबरदस्त संगीत ऐकायला मिळणार आहे. आता सिनेमातील ‘लाईन दे मला’ हे गाणं रिलीज झालं आहे.
'भिरकीट' च्या टिझर आणि पोस्टरने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. आता या सिनेमातील गाणी रसिकांच्या भेटीला आली असून हा सांगितिक सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या सिनेमात गिरीश कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, मोनालिसा बागल, कुशल बद्रिके, सागर कारंडे, लंगड्या उर्फ तानाजी गालगुंडे, कैलास वाघमारे, उषा नाईक, याकूब सय्यद यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
‘लाईन दे मला’ हे पहिले गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून या गाण्यात मोनालिसा बागल आणि तानाजी गालगुंडे यांची प्रेमकहाणी सोबतच रोमॅंटिक डान्सदेखील पाहायला मिळत आहे. हे गाणं मंगेश कांगणे यांनी शब्दबद्ध केलं असून या गाण्याचे बोल नकास अजीज ,आनंदी जोशी यांचे आहेत. मनाला भिडणारी ‘आसवांची’ आणि ‘गॉगल’ ही ठसकेदार लावणीही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमातील सर्व गाणी मंगेश कांगणे यांनी लिहिली असून ‘गॉगल’ हे गाणे उर्मिला धनगर, मंगेश कांगणे यांनी गायले आहे. तर ‘आसवांची’ हे भावनिक गाणं शैल हाडा यांनी गायले आहे.
‘भिरकीट’चे दिग्दर्शक अनुप जगदाळे म्हणाले,'हा एक धमाल विनोदी सिनेमा तर आहेच, शिवाय या सिनेमातील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणारी आहेत. ‘लाईन दे मला’ या गाण्यात तानाजी गालगुंडे प्रथमच प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमातील सर्व गाणी सिनेमाच्या कथेला अनुसरून शब्दबद्ध करण्यात आली आहेत."
अनुप जगदाळे यांनी ‘लाईन दे मला’ या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यानचा एक किस्सा शेअर केला आहे. ते म्हणाले,हे संपूर्ण गाणं तानाजी आणि मोनालिसा यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे. या गाण्यात आम्ही रोमान्ससोबतच धमालही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन तानाजीला अनुसरून केले आहे. त्याने अतिशय उत्तमरित्या हे नृत्य सादर केलं आहे, हे गाणं पाहताना त्याचा अनुभव येईलच. तानाजीनेही या नृत्यासाठी खूप मेहनत घेतली आहे.
संबंधित बातम्या
Bhirkit : 'भिरकीट' सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित; गिरिश कुलकर्णी आव्हानात्मक भूमिकेत
Bhirkit : 'भिरकीट'चा जबरदस्त टीझर रिलीज; 'या' दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)