Mission Majnu : 'मिशन मजनू' सिनेमाची रिलीज डेट ठरली, Siddharth malhotra अॅक्शन मोडमध्ये
Mission Majnu : सिद्धार्थ मल्होत्राचा आगामी 'मिशन मजनू' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Mission Majnu Release Date : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth malhotra) आणि रश्मिका मंदानाच्या (Rashmika Mandanna) आगामी 'मिशन मजनू' (Mission Majnu) सिनेमाचे नवे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. पोस्टर शेअर करत सिनेमाची रिलीज डेटदेखील जाहीर करण्यात आली आहे. 'मिशन मजनू' हा सिनेमा 10 जून 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
'मिशन मजनू' सिनेमात अॅक्शनचा तडका असणार आहे. या सिनेमात सिद्धार्थ अॅक्शन मोडमध्ये दिसून येणार आहे. हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित आहे. सिनेमात सिद्धार्थ एका रॉ एजेंटच्या भूमिकेत दिसून येणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने सिद्धार्थ आणि रश्मिकाची जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
View this post on Instagram
रश्मिका मंदाना 'मिशन मजनू' सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन शंतनु बागचीने केले आहे. सिद्धार्थच्या या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमात पाकिस्तान विरोधातील एक गुप्त ऑपरेशन दाखवण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या
Gangubai Kathiawadi : 'गंगूबाई काठियावाडी'चा बॉक्सऑफिसवर धमाका, 100 कोटींचा आकडा पार
Sharmaji Namkeen : ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट प्रदर्शित होणार; ‘शर्माजी नमकीन’ची रिलीज डेट जाहीर
Garam Kitly : CID मधील दया करतोय मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण; 'गरम किटली' मध्ये साकारणार प्रमुख भूमिका
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha