भांगेत कुंकू अन् डोळ्यावर गॉगल; 71 व्या वर्षी रेखानं लग्न केलं? लग्नाबाबत रेखाची भन्नाट प्रतिक्रिया, म्हणाली...
Veteran Actress Rekhas Stunning Reaction on Marriage Wins Hearts : "दुर्लभ प्रसाद की दुसरी शादी" आज सिनेमागृहात प्रदर्शित. स्क्रीनिंगवेळी रेखा आणि महिमा चौधरींची खास उपस्थिती.

परदेस फेम महिमा चौधरी आणि संजय मिश्रा अभिनीत "दुर्लभ प्रसाद की दुसरी शादी" हा चित्रपट आज सिनेमागृहात प्रदर्शित झाला. काल या चित्रपटाचे स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. स्क्रीनिंगवेळी अनेक कलाकार उपस्थित होते. तसेच ज्येष्ठ आणि बॉलिवूडची सदाबाहेर अभिनेत्री रेखा देखील उपस्थित होती. यावेळी पापाराझींसमोर रेखाने महिमा चौधरीसोबत फोटोशूट केले. तसेच पापाराझींसमोर लग्नाबाबत भन्नाट प्रतिक्रिया दिली. तिनं लग्नाबाबत दिलेली प्रतिक्रिया ऐकून आपण देखील अवाक् व्हाल.
अभिनेत्री महिमा चौधरी आणि संजय मिश्रा यांचा "दुर्लभ प्रसाद की दुसरी शादी" हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मोठ्या ब्रेकनंतर महिमा या चित्रपटाद्वारे बिग स्क्रीनवर झळकणार आहे. कालच या चित्रपटाचे स्क्रीनिंग झाले. स्क्रीनिंगमधील एका व्हायरल व्हिडिओमध्ये रेखा आणि महिमा चौधरी दिसत आहे. दोघेही एकत्र पोज देत पॅप्ससोबत गप्पा मारताना दिसत आहे.
भांगेत कुंकू अन् डोळ्यावर गॉगल...
रेखा पांढऱ्या सूट आणि प्रिंटेड दुपट्टामध्ये खूपच सुंदर दिसत आहे. मिनिमल मेकअप लूकमध्ये रेखाचं सौंदर्य उठून दिसत आहे. लाल लिपस्टिक आणि भांगेत तिनं सिंदूर भरला आहे. तसेच काळ्या रंगाचा गॉगल घातला आहे. पॅप्ससमोर पोज देताना महिमा चौधरी म्हणते, "मी दुसऱ्यांदा लग्न केले आहे", यावर रेखा म्हणते, "लग्न पहिले असो किंवा दुसरे... लग्नगाठ तर मी आयुष्याशी बांधली आहे"..हे ऐकून महिमा प्रतिक्रिया देते, "वाह, तेच असायला हवे..", महिमाच्या रिएक्शनवर रेखा म्हणते, "लग्न हे प्रेमाचे दुसरे नाव आहे. प्रेम असेल तर लग्न आहे.. लग्न आहे तर प्रेम आहे". सध्या दोघींचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
रेखाची लव्ह लाईफ कशी होती?
रेखाचं अनेक जणांसोबत नाव जोडलं गेलं होतं. रेखा आणि अमिताभ बच्चन यांची प्रेमकथा संपूर्ण बॉलिवूड आणि बॉलिवूड प्रेमींना ठाऊक आहे. या दोघांच्या लव्ह स्टोरीची प्रचंड चर्चा झाली होती. दरम्यान, कालांतराने हे जोडपे वेगळे झाले. रेखाने दिल्लीतील बिझनेसमॅन मुकेश अग्रवालशी लग्नगाठ बांधली होती. मात्र, लग्नाला एक वर्ष होण्यापूर्वीच मुकेशने आत्महत्या केली. तेव्हापासून रेखा अविवाहित आहे. अविवाहित असूनही रेखा तिच्या भांगेत कुंकू भरते. यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केला. रेखाने "ही एक स्टाइल स्टेटमेंट आहे", असं सांगितलं होतं. दरम्यान, तरीही रेखाचे आयुष्य अनेकांसाठी गूढ राहिले आहे.
हे ही वाचा -























