Raveena Tandon : मलायकाच्या लेकाबरोबर डेटिंगच्या चर्चा, पण रवीना टंडनला मान्य नाही लेकीचं प्रेम? म्हणाली, 'प्रेमात पडण्याची योग्य वेळ...'
Raveena Tandon : रवीना टंडनची लेक मलायकाच्या लेकाला डेट करत असल्याच्या चर्चा सुरु असतानाच तिने लेकीला एक प्रेमाचा सल्ला दिला आहे.
Raveena Tandon : रवीना टंडनची (Raveena Tandon) मुलगी राशा थडानी (Rasha Thadani) ही तिच्या बॉलीवूडमधील पदार्पणासाठी तयार झालीये. पण इतर स्टारकीड प्रमाणेच राशाच्या डेटींगच्या देखील सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. राशा मलायकाचा लेक अरहान खानला (Arhaan Khan ) डेट करत असल्याच्या जोरदार चर्चा सध्या बॉलीवूडमध्ये आहेत. पण याचदरम्यान रवीनाने लेकीच्या या प्रेमाला विरोध करत असल्याचंही म्हटलं जातंय.
रवीनाने नुकतच एका मुलाखतीदरम्यान तिच्या मुलीच्या रिलेशनशीप स्टेटसवर भाष्य केलं आहे. तिने फिल्मज्ञानीची बातचीत करताना म्हटलं की, मला असं वाटतं सध्या तिने प्रेमात न पडता तिच्या करिअरवर फोकस करावं. त्याचप्रमाणे शिक्षणाशी कोणतीही तडजोड करु नये.लेकीला दिलेल्या या सल्ल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
रवीनाने काय म्हटलं?
रवीनाने म्हटलं की, आता तरी सध्या तिने तिचा अभ्यास आणि करिअरवर फोकस करावं. एका व्यक्तीला त्याच्या आयुष्यात प्रॅक्टिकल असणंही गरजचं आहे. आता प्रेमात पडण्याची योग्य वेळ नाही. एक योग्य जोडीदार शोधण्यासाठी आधी अनेकांना भेटावं लागतं. पण कोणत्याही नात्यात घाई करुन चालणार नाही. रवीनाच्या या वक्तव्यांमुळे अरहानसोबतचं नातं तिला मान्य नसल्याचं म्हटलं जात आहे.
आईने लेकीला दिला प्रेमाचा सल्ला
पुढे रवीनाने म्हटलं की, मी माझ्या मुलीला सांगू इच्छिते की, तिने तिचा वेळ घ्यावा. घाई करु नये. मुलींना वाटतं लग्न करणं खूप फनी असतं. मेहंदी लावू, चांगले कपडे, मज्जा करु. पण लग्न ही मज्जा नाही तर एक कमीटमेंट आहे. त्यामुळे वेळ घेऊन आणि योग्य विचार करुनच तिने निर्णय घ्यावा, की कोणासोबत तुला आयुष्य घालवायचं आहे.
मी नेहमीच तिच्यासोबत आहे - रवीना
मला नाही असं वाटत की तिने माझ्या चुकांमधून शिकावं. तिने तिच्या चुका कराव्यात आणि त्यातून शिकावं. मी नेहमीच तिच्यासोबत आहे. मी तिच्या बाबतीत अत्यंत स्ट्रीक्ट आहे. पण आम्ही दोघी तितक्याच जवळ आहोत, असं म्हणत रवीनाने लेकीसोबतच्या नात्यावर भाष्य केलं आहे.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
Vidya Balan : मी धार्मिक आहे पण कधीही....; देशातील धार्मिक ध्रुवीकरणावर विद्या बालनने काय म्हटले?