एक्स्प्लोर

Vidya Balan : मी धार्मिक आहे पण कधीही....; देशातील धार्मिक ध्रुवीकरणावर विद्या बालनने काय म्हटले?

Vidya Balan : अभिनेत्री विद्या बालनने धार्मिक ध्रुवीकरणाबाबत महत्त्वाचे भाष्य केले आहे.

Vidya Balan : देशात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक प्रचारात धर्माच्या मुद्यावरही भाषणे होत आहे. तर, मागील काही वर्षांपासून देशभरात धार्मिक ध्रुवीकरण होत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यातूनच देशात धार्मिक द्वेष निर्माण होत असल्याचे म्हटले जात आहे. एका बाजूला ही परिस्थिती असताना दुसरीकडे अनेकजण भाष्य करत आहेत. यात आता अभिनेत्री विद्या बालनने (Vidya Balan) महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. याआधी देशाला कोणतीही धार्मिक ओळख नव्हती पण आता परिस्थिती बदलली असल्याचे तिने म्हटले. 

'अनफिल्टर्ड बाय समदीश' या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत विद्या बालनने अनेक प्रश्नांची उत्तरे मनमोकळेपणाने दिली. या मुलाखतीत तिला देशात आता धर्माचे अधिक ध्रुवीकरण झाले आहे असे तिला वाटते का? असे विचारण्यात आले.  या प्रश्नावर उत्तर देताना विद्या बालनने, "होय, मला वाटते की नक्कीच अधिक ध्रुवीकरण झाले आहे." एक देश म्हणून आपली पूर्वी कोणतीही धार्मिक ओळख नव्हती, पण आता का कळत नाही... हे फक्त राजकारणात नाही, तर सोशल मीडियातही त्याचे प्रतिबिंब दिसते. आपण जगात हरवून गेलो आहोत आणि आपण  आपल्या अशा ओळखीचा शोध घेतोय की ती ओळखच नाही. 

धार्मिक जागांसाठी निधी देत नाही... 

विद्या बालनने सांगितले की, तिने कधीही धार्मिक कामासाठी कधीही पैसे दिले नाहीत. त्यांना निधी, पैसे देण्याऐवजी मी आरोग्य, स्वच्छताविषयक उपक्रम, शैक्षणिक उपक्रमांना निधी देते. मी धार्मिक आहे, सश्रद्ध आहे. मी दररोज पूजा देखील करते असेही विद्याने म्हटले. तिला कोणत्या क्षेत्रात काम करायचे आहे असे विचारले असता ती म्हणाली, आरोग्य, स्वच्छता आणि शिक्षण यामध्ये मला काम करण्यास आवडेल. तुम्ही हॉस्पिटल, शाळा किंवा शौचालय बांधत असाल तर मी आनंदाने देणगी देईन, पण कोणत्याही धार्मिक संस्थेसाठी नाही असेही तिने स्पष्ट केले. 

राजकारणापासून दोन हात लांब....

या दरम्यान विद्याने सांगितले की,  राजकारणावर भाष्य करणार नाही. कोणत्याही कमेंटमुळे एखाद्याला राग येतो आणि मग तुमच्यावर बहिष्कार टाकला जातो असेही तिने म्हटले. विद्या बालनने पुढे म्हटले की, मला राजकारणाची खूप भीती वाटते, आमच्यावर बंदी वगैरे घातली जाईल असे वाटते. अर्थात अजून तरी माझ्यासोबत असे घडले नाही. पण आता कलाकार राजकारणावर बोलत नाहीत कारण कोणाला राग येईल हे कधीच कळत नाही. विशेषतः चित्रपट रिलीजच्या दरम्यान कधीच बोलत नाही. एका चित्रपटावर 200 लोक मेहनत करतात, चित्रपटाला त्या राजकीय कमेंटचा फटका बसल्यास त्या 200 लोकांचेही नुकसान असते  त्यामुळे मी राजकारणापासून दूर राहते,असेही तिने म्हटले.

महत्त्वाच्या बातम्या

Urfi javed Slams Adnan Shaikh: 'पब्लिक प्रॉपर्टी..'प्रसिद्ध युट्यूबर विधवा अन् घटस्फोटीत महिलांबाबतीत काय म्हणाला? उर्फी जावेद का भडकली?
'पब्लिक प्रॉपर्टी..'प्रसिद्ध युट्यूबर विधवा अन् घटस्फोटीत महिलांबाबतीत काय म्हणाला? उर्फी जावेद का भडकली?
Anuradha Paudwal on Personal Life: 25 दिवसांत चिमुकलीचा मृत्यू, तरुण मुलालाही गमावलं; अनुराधा पौडवाल यांच्या आयुष्यात दु:खाचे वादळ
25 दिवसांत चिमुकलीचा मृत्यू, तरुण मुलालाही गमावलं; अनुराधा पौडवाल यांच्या आयुष्यात दु:खाचे वादळ
Alia Bhatt in Tumbad 2: 'पुन्हा हस्तरचा थरार...; 'तुंबाड 2'मध्ये आलिया भट्टची एन्ट्री, कोणती भूमिका साकारणार? रिलीज डेटही जाहीर
'पुन्हा हस्तरचा थरार...; 'तुंबाड 2'मध्ये आलिया भट्टची एन्ट्री, कोणती भूमिका साकारणार? रिलीज डेटही जाहीर
Marathi TV Actress Madhavi Nimkar Becomes Businesswomen: प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं व्यावसाय क्षेत्रात पाऊल, कल्याणमध्ये सुरू करणार हॉटेल, नावंही सांगितलं...
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं व्यावसाय क्षेत्रात पाऊल, कल्याणमध्ये सुरू करणार हॉटेल, नावंही सांगितलं...

व्हिडीओ

Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE
Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2026 | मंगळवार
MLWF : जून महिन्याच्या पगारात 25  रुपयांची कपात, जूनच्या पगारातून कपात झालेली रक्कम कुठे जमा होते? नेमके काय फायदे मिळतात?
जूनच्या पगारातून कपात झालेले 25 रुपये कुठे जमा होतात? नेमके काय फायदे मिळतात?
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
IND vs ENG : बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, पहिल्या वनडेत टीम इंडियाची दमदार कामगिरी
बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, टीम इंडियाची दमदार कामगिरी
Chhatrapati Sambhajinagar : बाबा इतरांसाठी डॉन असतील, पण...; 5.5 कोटींच्या जप्तीनंतर बाबा फर्जनच्या मुलाचा संपत्तीवर दावा; महिलेबाबत मोठा खुलासा
बाबा इतरांसाठी डॉन असतील, पण...; 5.5 कोटींच्या जप्तीनंतर बाबा फर्जनच्या मुलाचा संपत्तीवर दावा; महिलेबाबत मोठा खुलासा
SIR Mumbai Crime: घरी पती आजारी, एसआयआरच्या कामाचा ताण झेपेना, मुंबईत बीएलओ शिक्षिकेने शाळेतच झोपेच्या गोळ्या घेतल्या अन्...
घरी पती आजारी, एसआयआरच्या कामाचा ताण झेपेना, मुंबईत बीएलओ शिक्षिकेने शाळेतच झोपेच्या गोळ्या घेतल्या अन्...
तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका, बनावट FDA अधिकारी बनून 6 लाख लुटले; स्वीट मार्ट दुकानदाराच्या तक्रारीनंतर दोघांना अटक
तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका, बनावट FDA अधिकारी बनून 6 लाख लुटले; स्वीट मार्ट दुकानदाराच्या तक्रारीनंतर दोघांना अटक
TET Exam Paper Leak: 8 हजारांत बाहेर पडलेला पेपर 80 हजारांत विकला गेला; कशी मिळाली पहिली टिप? कसा उलगडला संपूर्ण कट, मोठा प्लॅन आला समोर
8 हजारांत बाहेर पडलेला पेपर 80 हजारांत विकला गेला; कशी मिळाली पहिली टिप? कसा उलगडला संपूर्ण कट, मोठा प्लॅन आला समोर
Embed widget