(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Azad Teaser Out : दोन स्टारकिड्स फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पणासाठी सज्ज, क्यूट अभिनेत्री बॉलिवूड डेब्यू आधीच हिट
Rasha Thadani & Aaman Devgan Debut : अभिनेत्री रवीना टंडनची लेक राशा थडानी आणि अजय देवगणचा भाचा अमान देवगण बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून त्यांच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
Azad Movie Trailer : बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा सिंघम अगेन चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करताना दिसत आहे. अशातच आता 'सिंघम' स्टारच्या आगामी चित्रपटाचा टीझर समोर आला आहे. महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटातून अजय देवगणने दोन स्टारकिड्सला लाँच करण्याची जबाबदारी घेतली आहे.अभिनेत्री रवीना टंडनची लेक राशा थडानी आणि अजय देवगणचा पुतण्या अमान देवगण बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून त्यांच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
दोन स्टारकिड्स फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पणासाठी सज्ज
सिंघम स्टार अजय देवगणची यंदाची दिवाळी फार व्यस्त ठरताना दिसत आहे. सिंघम अगेन यशानंतर अवघ्या काही दिवसांतच अजय देवगणने तयांच्या आगामी आझाद चित्रपटाचा टीझर रिलीज केला. आझाद या आगामी पीरियड ड्रामामध्ये चित्रपटात अजय देवगण सोबत इंडस्ट्रीत दोन नवे चेहरे सामील होणार आहेत. दोन स्टारकिड्सच्या डेब्यूची जबाबदारी अजय देवगणने घेतली आहे. अजय देवगणचा पुतण्या अमान देवगण आणि अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानी हे दोघेही या ऐतिहासिक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत.
'सिंघम'ने घेतली जबाबदारी
आझाद या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटातून बॉलीवूडचे दोन मोठे स्टार किड्सही आपला चित्रपटसृष्टीतील प्रवास सुरू करणार आहेत. चित्रपटाचा टीझर जबरदस्त ॲक्शनने भरलेला टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाची कथा ऐतिहासिक ॲक्शन ड्रामा असणार आहे. रवीना टंडनची मुलगी राशा थडानी आणि अजय देवगणचा भाचा अमान देवगण या चित्रपटातून पदार्पण करणार आहेत. या चित्रपटात डायना पेंटीही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मंगळवारी या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. ज्यामध्ये पुढील वर्षी म्हणजेच जानेवारी 2025 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
क्यूट अभिनेत्री बॉलिवूड डेब्यू आधीच हिट
90 च्या दशकातील बॉलिवूड स्टार अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानी तिच्या बॉलिवूड डेब्यूपूर्वीच सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. राशाच्या क्यूटनेसचे लाखो चाहते आहेत आणि तिचे 1.2 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. राशा थडानी याआधीही काही मॉडेलिंग शोमध्ये दिसली आहे. राशालाही तिच्या आईप्रमाणे बॉलिवूड अभिनेत्री बनायचं स्वप्न आहे. राशाने अजय देवगणसोबत आझाद चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. राशासोबतच अजय देवगणचा भाचा अमन देवगनही फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू करणार आहे. टीझरनुसार राशा आणि अमन ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसतील, असा अंदाज लावला जात आहे.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :