एक्स्प्लोर
Satyacha Morcha: 'अॅनाकोंडाला कोंडावंच लागेल', मतदार याद्यांवरून Uddhav Thackeray सरकारवर बरसले
मतदार याद्यांमधील (Voter Lists) घोळावरून राज ठाकरे (Raj Thackeray), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांनी निवडणूक आयोग (Election Commission) आणि सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. 'दुबार तिबार मतदान करणाऱ्याला फोडून काढा आणि पोलिसांच्या ताब्यात द्या,' असा थेट आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला. मुंबईत काढण्यात आलेल्या 'सत्याचा मोर्चा'मध्ये (Satyacha Morcha) बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. कल्याण, डोंबिवली आणि भिवंडी येथील साडेचार हजार मतदारांनी मलबार हिल मतदारसंघातही मतदान केल्याचा आरोप राज ठाकरेंनी पुराव्यांसह केला. तर, उद्धव ठाकरेंनी सरकारला 'अॅनाकोंडा'ची उपमा देत, 'या अॅनाकोंडाला आता कोंडावंच लागेल, नाहीतर हे सुधारणार नाहीत,' असे म्हटले. मतदार याद्या जोपर्यंत स्वच्छ आणि अचूक होत नाहीत, तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत, अशी भूमिका सर्वच विरोधी पक्षांनी घेतली आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
क्रिकेट
मुंबई
Advertisement
Advertisement

















