(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rashmika Mandanna Vijay Deverakonda : रश्मिका मंदाना अन् विजय देवरकोंडाच्या साखरपुड्याच्या चर्चा; अखेर अभिनेत्याच्या टीमने दिली खरी माहिती
Rashmika Mandanna Vijay Deverakonda Engagement : अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचा साखरपुडा होणार असल्याची सध्या चर्चा सुरू आहे. अखेर अभिनेत्याच्या टीमने यासंदर्भात माहिती दिली आहे.
Rashmika Mandanna Vijay Deverakonda Engagement Update : दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीसह बॉलिवूड गाजवणारी रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) यांच्या अफेअरची चांगलीच चर्चा आहे. दोन दिवसांपासून विजय आणि रश्मिकाचा साखरपुडा होणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. आता अभिनेत्याच्या टीमने यासंदर्भात खुलासा करत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा त्यांच्या सिनेमांसह वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतात. रश्मिका आणि विजय सध्या साखरपुड्याच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. त्यांच्या साखरपुड्याची आणि लग्नाची चाहत्यांनाही उत्सुकता आहे.
रश्मिका-विजयचा खरचं साखरपुडा होणार? (Rashmika Mandanna Vijay Devarkonda Engagement New Update)
रश्मिका आणि विजयने अद्याप त्यांचं रिलेशन जगजाहीर केलेलं नाही. आता विजयच्या टीमने साखरपुड्याच्या बातम्या समोर आल्यानंतर याबद्दल मौन सोडलं आहे. आयएएनएसच्या रिपोर्टनुसार, दोन्ही कलाकारांच्या टीमने सारखपुड्याच्या बातम्यांमध्ये काही तथ्य नसल्याचं म्हटलं आहे.
View this post on Instagram
रश्मिका आणि विजय हे मनोरंजनसृष्टीतलं चर्चेत असणारं कपल आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत. 'गीता गोविंदम' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान रश्मिका आणि विजयची पहिली भेट झाली. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान त्यांची चांगली मैत्री झाली आणि ते एकमेकांना डेट करू लागले. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा गाजला. त्यानंतर 'डियर कॉम्रेड' या सिनेमात ते एकत्र झळकले. दोघांना आजवर अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. पण त्यांनी त्यांचं नातं गुलदस्त्यातच ठेवलं आहे. पण तरीही त्यांच्या अफेरच्या चर्चा मात्र चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.
रश्मिका-विजयच्या आगामी कलाकृतींबद्दल जाणून घ्या... (Rashmika Mandanna Vijay Deverkonda Upcoming Project)
रश्मिकाचा 'अॅनिमल' हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धमाका करत आहे. अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' (Pushpa 2) या सिनेमातही ती दिसणार आहे. तसेच रेनबो, द गर्लफ्रेंड आणि चावा हे तिचे आगामी सिनेमे आहेत. दुसरीकडे विजयचे 'फॅमिली स्टार' 'वीडी 12' हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत. तसेच त्यांच्या आगामी सिनेमांसह लग्नसोहळ्याचीदेखील चाहत्यांना उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या