एक्स्प्लोर

Rashid Khan Demise: प्रसिद्ध शास्त्रीय गायक राशिद खान यांचे निधन; वयाच्या 55 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

प्रसिद्ध शास्त्रीय गायक राशिद खान (Rashid Khan) यांनी वयाच्या 55 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. राशिद खान यांच्या निधनानं संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

Rashid Khan Demise:  प्रसिद्ध शास्त्रीय गायक राशिद खान (Rashid Khan) यांचं आज दुपारी 3.45 वाजता निधन झालं आहे. वयाच्या 55 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. उस्ताद रशीद खान यांना प्रोस्टेट कॅन्सर झाला होता, त्यामुळे त्यांच्यावर कोलकाता येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. ते व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन सपोर्टवर होते. उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले आहे. राशिद खान यांच्या निधनानं संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

उस्ताद रशीद खान यांच्यावर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, "आम्ही खूप प्रयत्न केले,पण  प्रयत्नांना  यश मिळाले नाही. रशीद खान यांचे दुपारी  3.45 च्या सुमारास निधन झाले.'

ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला शोक

उस्ताद रशिद खान यांच्या निधनाची बातमी कळताच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, 'संपूर्ण देशाचे आणि संपूर्ण संगीत जगताचे हे मोठे नुकसान आहे. मी खूप दु:खी झाले आहे. मला अजूनही विश्वास बसत नाही की राशिद खान हे आता आपल्यात नाहीयेत."

गेल्या महिन्यात सेरेब्रल अटॅक आल्यानंतर उस्ताद रशिद खान यांची प्रकृती खूपच खालावली होती. त्यांनी सुरुवातीला टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले होते. त्यानंतर त्यांनी कोलकाता येथील रुग्णालयात उपचार सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

राशिद खान यांनी 'या' चित्रपटांमधील गाणी गायली

शाहिद कपूर आणि करीना कपूर यांच्या 'जब वी मेट' या चित्रपटातील 'आओगे जब तुम' ही बंदिश  उस्ताद रशिद खान यांनी गायली होती. जी खूप लोकप्रिय झाली.  'माय नेम इज खान', 'राझ 3', 'मंटो' आणि 'शादी में जरूर आना' यांसारख्या चित्रपटांमधील गाणी देखील  उस्ताद रशिद खान  यांनी गायली आहेत. 

उत्तर प्रदेश येथील बदाऊन येथे जन्मलेले रशिद खान हे उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे पुतणे होते. त्यांनी सुरुवातीचे प्रशिक्षण त्यांचे आजोबा उस्ताद निसार हुसेन खान (1909-1993) यांच्याकडून घेतले. रशिद खान हे उस्ताद रामपूर- सहसवान  घराण्याचे गायक होते. त्यांनी वयाच्या 11 व्या वर्षी पहिला स्टेज परफॉर्मन्स दिला होता. रशिद खान यांच्या पश्चात पत्नी सोमा, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

राशिद खान यांनी 'या' पुस्कारांनी करण्यात आलं सन्मानित

राशिद खान यांना पद्मश्रीसह संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. तसेच सर्वोच्च नागरिक पुरस्कार पद्मभूषणदेखील त्यांना प्रदान करण्यात आला आहे.  

संबंधित बातम्या:

Vijayakanth Passed Away : DMDk चे संस्थापक आणि अभिनेते विजयकांत यांचे कोरोनाने निधन; 71 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

 

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan in Alliance: 'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
Prapti Redkar on harassment: 'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
Maitreya Marathi Film: मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
Saurabh Choughule Ajinkya Rahane: अजिंक्य राहाणेचा क्रिकेटला अखेरचा रामराम, अन् मराठी अभिनेत्याला आलं भरून, लहानपणीचा फोटो केला शेअर, म्हणाला...
अजिंक्य राहाणेचा क्रिकेटला अखेरचा रामराम, अन् मराठी अभिनेत्याला आलं भरून, लहानपणीचा फोटो केला शेअर, म्हणाला...

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget