एक्स्प्लोर

Vijayakanth Passed Away : DMDk चे संस्थापक आणि अभिनेते विजयकांत यांचे कोरोनाने निधन; 71 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Vijayakanth : प्रसिद्ध तमिळ अभिनेते व तामिळनाडू विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते कॅप्टन विजयकांत यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.

Vijayakanth Passed Away : लोकप्रिय तमिळ अभिनेते व तामिळनाडू विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते कॅप्टन विजयकांत (Vijaykanth) यांचे निधन झाले आहे. कोरोनामुळे त्यांचे निधन झाल्याचं समोर आलं आहे. कॅप्टन विजयकांत डीएमडीके पक्षाचे नेते होते. 20 नोव्हेंबरपासून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. 

विजयकांत कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. MIOT रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. विजयकांत यांच्या निधनानंतर रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

कॅप्टन विजयकांत डीएमडीके पक्षाचे नेते

वियकांत यांनी 2005 मध्ये देसिया द्रविड कडगम (DMDK) या पक्षाची स्थापना केली होती. 2006 मध्ये त्यांनी तामिळनाडू निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत विजयकांत यांचा विजय झाला होता. 2011 च्या विधानसभा निवडणुकीत डीएमडीकेला यश आलं. 41 जागांपैकी 29 जागा पार्टीला मिळाल्या होत्या. 

कोण आहेत विजयकांत? 

तामिळनाडूच्या राजकारणातील एक महत्वाचा चेहरा म्हणजे विजयकांत. ते DMDK पक्षाचे संस्थापक सदस्य आणि विद्यमान अध्यक्ष होते. 2011 ते 2016 दरम्यान विरोधी पक्षनेते पदावर त्यांनी काम केलं आहे. तसेच टॉलिवूडमधील ते एक लोकप्रिय अभिनेते आहेत. 154 सिनेमांत त्यांनी काम केलं आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे 20 नोव्हेंबर रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. 

विजयकांत यांनी 154 सिनेमांत आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. चेन्नईत विजयकांत यांचं एक इंजीनियरिंग कॉलेज आणि कोयम्बेडु नावाचा लग्नाचा हॉल आहे. अभिनेते असण्यासोबत ते निर्माता आणि दिग्दर्शकही होते.  विरुधाचलम आणि ऋषिवंदियम या मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं आहे. 

विजयकांत यांचा सिनेप्रवास (Vijayakanth Movies)

विजयकांत यांनी 'इनिक्कुल इलामाई' या सिनेमाच्या माध्यमातून 1979 रोजी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या सिनेमात त्यांनी विरोधी भूमिका साकारली होती. एमए काजा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. विजयकांत यांचे आगल विलक्कू, नीरोत्तम आणि सामंथिप्पू हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले आहेत. तर नूरवथु नाल, वैदेगी काथिरुंथाल, कूलिएकरन, वीरन, वेलुथांबी, उझवान मगन हे सिनेमे त्याचे सुपरहिट ठरले आहेत.

विजयकांतने विविध सिनेमांत अष्टपैलू भूमिका साकारल्या आहेत. पण अॅक्शन हिरो म्हणूनही ते लोकप्रिय होते. विजयकांत यांचे अनेक सिनेमे ब्लॉकबस्टर झाले आहेत. फिल्मफेअर पुरस्कासह अनेक नामांकित पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. 

संबंधित बातम्या

Madhuri Dixit : माधुरी दीक्षित निवडणूक लढवणार? 'माझा कट्ट्यावर' बॉलिवूडच्या 'धक धक गर्ल'चा खुलासा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar: अजितदादांनी भाजप शिवसेनेच्या विरोधाला दाखवला कात्रजचा घाट! मुंबई मनपा निवडणुकीची कमान नवाब मलिकांच्याच खांद्यावर
अजितदादांनी भाजप शिवसेनेच्या विरोधाला दाखवला कात्रजचा घाट! मुंबई मनपा निवडणुकीची कमान नवाब मलिकांच्याच खांद्यावर
RBI : रिझर्व्ह बँकेची महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेवर कारवाई, सहा महिन्यांचे निर्बंध, ठेवी स्वीकारणे, कर्ज देण्यास मनाई
रिझर्व्ह बँकेची महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेवर कारवाई, सहा महिन्यांसाठी निर्बंध,
सुषमा अंधारेंकडून एकनाथ शिंदेंच्या भावावर 145 कोटींच्या ड्रग्सचे गंभीर आरोप; प्रकाश शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
सुषमा अंधारेंकडून एकनाथ शिंदेंच्या भावावर 145 कोटींच्या ड्रग्सचे गंभीर आरोप; प्रकाश शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीसांनी घ्यावी; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीसांनी घ्यावी; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

व्हिडीओ

Eknath Shinde Brother : साताऱ्यातील सावरी गावात शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टजवळ ड्रग्स सापडलं- अंधारे
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, आमदारकी जाणार? वकील काय म्हणाले?
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक
Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar: अजितदादांनी भाजप शिवसेनेच्या विरोधाला दाखवला कात्रजचा घाट! मुंबई मनपा निवडणुकीची कमान नवाब मलिकांच्याच खांद्यावर
अजितदादांनी भाजप शिवसेनेच्या विरोधाला दाखवला कात्रजचा घाट! मुंबई मनपा निवडणुकीची कमान नवाब मलिकांच्याच खांद्यावर
RBI : रिझर्व्ह बँकेची महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेवर कारवाई, सहा महिन्यांचे निर्बंध, ठेवी स्वीकारणे, कर्ज देण्यास मनाई
रिझर्व्ह बँकेची महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेवर कारवाई, सहा महिन्यांसाठी निर्बंध,
सुषमा अंधारेंकडून एकनाथ शिंदेंच्या भावावर 145 कोटींच्या ड्रग्सचे गंभीर आरोप; प्रकाश शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
सुषमा अंधारेंकडून एकनाथ शिंदेंच्या भावावर 145 कोटींच्या ड्रग्सचे गंभीर आरोप; प्रकाश शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीसांनी घ्यावी; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीसांनी घ्यावी; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
बीड अन् धाराशिव पोलिसांची सिनेस्टाईल 'रेड'; राना-वनातून घुसल्या गाड्या, चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या
बीड अन् धाराशिव पोलिसांची सिनेस्टाईल 'रेड'; राना-वनातून घुसल्या गाड्या, चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या
Prithviraj Chavan: ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
शिंदेंच्या शिवसेनेची काँग्रेससोबत हातमिळवणी; फोटो शेअर करत दानवेंची टीका, शिंदेसेनेचाही पलटवार
शिंदेंच्या शिवसेनेची काँग्रेससोबत हातमिळवणी; फोटो शेअर करत दानवेंची टीका, शिंदेसेनेचाही पलटवार
Dhananjay Munde: आपदा में अवसर! इकडं माणिकराव संकटात अन् तिकडं शांतीत क्रांती करत धनुभाऊंची थेट दिल्लीत 'मन की बात'; योगायोग की नियोजित घरवापसी?
आपदा में अवसर! इकडं माणिकराव संकटात अन् तिकडं शांतीत क्रांती करत धनुभाऊंची थेट दिल्लीत 'मन की बात'; योगायोग की नियोजित घरवापसी?
Embed widget