Hanuman Ansh OTT: 'हनुमान अंश' आता ओटीटीवर रिलीज होणार, पण कधी अन् कोणत्या प्लॅटफॉर्मवर? 5 भाषेत पाहता येणार
Hanuman Ansh OTT: विशाल चतुर्वेदी दिग्दर्शित 'हनुमान अंश' आता ओटीटीवर रिलीज होणार आहे.

Hanuman Ansh: कमी बजेटमध्ये तयार करण्यात आलेला 'हनुमान अंश' (Hanuman Ansh) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर (Box Office) धुमाकूळ घातला. 'हनुमान अंश' या चित्रपटाने बॉक्स ऑफिस विक्रमी कमाई केली. बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी केल्यानंतर आता हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) रिलीज होण्यास सज्ज झाला आहे. केवळ हिंदी नाही तर, हा सिनेमा विविध भाषांमध्ये रिलीज होणार आहे. Vishal Chaturvedi दिग्दर्शित हा सिनेमा कोणत्या ओटीटी (Netflix) प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार? कधी आणि किती भाषांमध्ये रिलीज होणार? जाणून घेऊयात.
'हनुमान अंश' ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार, पण कधी? (Hanuman Ansh OTT Release When and Where to Watch)
मिळालेल्या माहितीनुसार, 'हनुमान अंश' हा सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्यास सज्ज झाला आहे. हा सिनेमा 27 नोव्हेंबर 2026 रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार आहे. हा सिनेमा सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे. आता या सिनेमाच्या इतर भाषांमधील ओटीटी प्रदर्शनाबाबतीत माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'हनुमान अंश' हा सिनेमा केवळ हिंदी नाही तर, तेलुगु, तामिळ, मल्याळम, कन्नड आणि गुजराती या भाषांमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. माहितीनुसार, 'हनुमान अंश' हा सिनेमा इतर भाषांमध्ये नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. हा सिनेमा इतर भाषांमध्ये तुम्ही 29 नोव्हेंबरपासून पाहू शकता.
View this post on Instagram
नेटफ्लिक्सने यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. नेटफ्लिक्सने पोस्टमध्ये म्हटलं की, 'श्रद्धेने आयुष्य बदलले पण भक्तीने हजारो लोकांचे जीवन बदलले. भगवान हनुमान यांच्या खऱ्या भक्ताची दिव्य कथा. आता नेटफ्लिक्सवर उपलब्ध'. 'हनुमान अंश' हा सिनेमा 29 नोव्हेंबर रोजी तेलुगु, तामिळ, कन्नड, मल्याळम आणि गुजराती भाषांमध्ये रिलीज होईल. 'हनुमान अंश' हा सिनेमा जेव्हा रिलीज झाला, तेव्हा या चित्रपटाची फारशी चर्चा झालेली नाही. पण तरीही या सिनेमाने ओपनिंगला 10 लाख रुपयांची कमाई केली. सोशल मीडियावर मिळत असलेल्या पॉझिटिव्ह रिस्पॉन्सचा फायदा या सिनेमाला झाला. केवळ 2 कोटी बजेटमध्ये बनलेला हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. या सिनेमाने 404 कोटी रुपयांचे ग्रॉस कलेक्शन केले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:






















