एक्स्प्लोर

Pune Shivajinagar Court Mandhar Kiwale Case: शुभमच्या सख्ख्या भावानेच मंदारवरील हल्ल्याचा कट रचला; पुण्यातील किवळेप्रकरणी सगळ्यात मोठा ट्विस्ट

Pune Shivajinagar Court Mandhar Kiwale Case: पुण्याच्या शिवाजीनगर भागातील सत्र न्यायालयाच्या जवळ काल 6 जणांच्या टोळक्याने मंदार किवळे याच्यावर आधी गोळीबार केला.

Pune Shivajinagar Court Mandhar Kiwale Case: पुण्याच्या शिवाजीनगर भागातील सत्र न्यायालयाच्या (Pune Shivajinagar Court) जवळ काल (25 नोव्हेंबर) 6 जणांच्या टोळक्याने मंदार किवळे (Pune Mandhar Kiwale Case) याच्यावर आधी गोळीबार केला. गोळीचा नेम चुकल्यानंतर त्यांनी मंदार किवळेचा पाठलाग केला आणि त्यानंतर त्यांच्यावर कोयत्यानं वार केले. यात त्याचे दोन्ही हात तुटले होते. गंभीर जखमी झालेल्या किवळेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.दरम्यान आरोपींनी हल्ला केल्यानंतर हम बाप है अशा घोषणा देत दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. 2025 मध्ये पुण्याच्या कात्रज भागात जमिनीच्या वादातून शुभम चव्हाण (Shubham Chavan) या तरुणाची हत्या करण्यात आली होती. त्या आरोपींमध्ये किवळेही होता. अटकेतील किवळेला 2 दिवसांपूर्वीच जामीन मिळाला होता. त्यानंतर आरोपींनी हीच संधी साधत किवळेला लक्ष्य केलं. दरम्यान याप्रकरणी आत्तापर्यंत 6 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. (Pune Firing News)

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, शुभमचा सख्खा भाऊ अक्षय चव्हाण यानेच संपूर्ण कट रचला. तसेच, या कटाची अंमलबजावणी करण्यासाठी त्याने इतर आरोपींना सुपारी दिल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील शिवाजीनगर सत्र न्यायालयाबाहेर मंदार किवळेवर झालेला जीवघेणा हल्ला बदल्याच्या भावनेनं केल्याची माहिती समोर आली. 2025 मध्ये झालेल्या शुभम चव्हाण हत्या प्रकरणाचा बदला घेण्यासाठी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. शुभमचा भाऊ अक्षय चव्हाणने 12 ते 15 तरुणांना एकत्र करून कट रचल्याची माहिती समोर आलीय. जामिनावर बाहेर आलेल्या मंदार किवळेवर पाळत ठेवून हल्ला केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. जखमी किवळेवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहे. (Pune Crime News)

अखेर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना आली जाग- (Pune Shivajinagar Court Mandhar Kiwale Case)

शिवाजीनगर कोर्टबाहेर गोळीबार आणि कोयता हल्ल्यानंतर पोलीस आयुक्त अमिते शकुमार दिवसभर फिरकले नाहीत. ते कोर्टपासून जवळचं असलेल्या शिवाजीनगर मुख्यालयातच हजर होते. पोलिसांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत ते व्यस्त होते. पण पुण्याला हादरून सोडणाऱ्या आणि न्यायालयाच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करणाऱ्या धक्कादायक घटनेनंतर, ते घटनास्थळी दिवसभरात फिरकले नाहीत. आता मात्र पोलीस आयुक्तांना जाग आलीये. ते उद्या सुरक्षेच्या दृष्टीने न्यायालय आवाराची पाहणी करणार आहेत. त्यानंतर बैठक घेऊन पुढची पावलं उचलली जातील. पण घडलेल्या घटनेचं काय? असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे.

न्यायालय परिसरातील हल्ल्यात जखमी मंदार किवळेला राजेश काची यांची मदत- (Pune Shivajinagar Court Mandhar Kiwale Case)

मंदार किवळे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर घटनास्थळी कोणीही त्यांच्या मदतीसाठी पुढे येत नव्हते. अशा परिस्थितीत राजेश दामोदर काची यांनी धाडस दाखवत जखमी किवळे यांना रिक्षातून ससून रुग्णालयात नेलं आणि उपचारासाठी दाखल केलं.हल्ल्याच्या घटनेनंतर जखमीला तातडीने रुग्णालयात पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम राजेश काची यांनी केलं. यासोबतच त्यांनी पोलिसांनाही घटनेची माहिती देत मदत केली. राजेश काची हे यापूर्वीही विविध घटनांमध्ये पोलिसांना मदत करत असल्याचं सांगितलं जात आहे. एखाद्या व्यक्तीचा मृतदेह घटनास्थळी पडलेला असला, तरी तो हलवण्यापासून ते पोलिसांना मदत करण्यापर्यंत ते पुढाकार घेतात.न्यायालय परिसरातील हल्ल्याच्या घटनेतही त्यांनी दाखवलेलं धाडस आणि माणुसकी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

संबंधित बातमी:

Pune Crime News : पुणे तिथे गुन्हेच गुन्हे! कोर्टाबाहेरील गोळीबाराने खळबळ; पोर्शे अपघात ते कोमकर-आंदेकर गँगवार, गेल्या तीन वर्षात पुण्याला हादरवणाऱ्या 10 गुन्हेगारी घटना

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News : पुणे तिथे गुन्हेच गुन्हे! कोर्टाबाहेरील गोळीबाराने खळबळ; पोर्शे अपघात ते कोमकर-आंदेकर गँगवार, गेल्या तीन वर्षात पुण्याला हादरवणाऱ्या 10 गुन्हेगारी घटना
पुणे तिथे गुन्हेच गुन्हे! कोर्टाबाहेरील गोळीबाराने खळबळ; पोर्शे अपघात ते कोमकर-आंदेकर गँगवार, गेल्या तीन वर्षात पुण्याला हादरवणाऱ्या 10 गुन्हेगारी घटना
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात हायकोर्टाचे राज्य सरकारला खडे बोल; भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश, नेमकं काय घडलं?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात हायकोर्टाचे राज्य सरकारला खडे बोल; भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश, नेमकं काय घडलं?
दुपारी पुण्यात, संध्याकाळी मुंबईत, गोळीबाराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला, माहीम परिसरात सोन्याच्या दुकानावर गोळीबार झाल्यानं खळबळ
दुपारी पुण्यात, संध्याकाळी मुंबईत, गोळीबाराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला, माहीम परिसरात सोन्याच्या दुकानावर गोळीबार झाल्यानं खळबळ
पुण्यात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुण्याचं पालकत्व घ्यावं, खासदार सुप्रिया सुळेंची विनंती
पुण्यात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुण्याचं पालकत्व घ्यावं, खासदार सुप्रिया सुळेंची विनंती
Advertisement

व्हिडीओ

Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : सोने चांदीच्या दरात आज मोठी घसरण, MCX वर सोने 1 लाख 20 हजार रुपयांच्या खाली पोहोचलं, चांदीच्या दरात 8000 रुपयांची घसरण
Gold Rate : सोने चांदीच्या दरात आज मोठी घसरण, MCX वर सोने 1 लाख 20 हजार रुपयांच्या खाली पोहोचलं
Donald Trump : अमेरिकेचा भारतासह एकूण 14 देशांवर नव्यानं 25 टक्के टॅरिफ लादण्याचा इशारा, अखेर भारतानं ठाम प्रत्युत्तर दिलं...
अमेरिकेचा भारतासह एकूण 14 देशांवर नव्यानं 25 टक्के टॅरिफ लादण्याचा इशारा, अखेर भारतानं ठाम प्रत्युत्तर दिलं...
Pune Bopdev Accident : पुण्याच्या बोपदेव घाटातून उतारानं येणारा टेम्पो काळ बनून आला, तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोन जण जखमी 
पुण्याच्या बोपदेव घाटातून उतारानं येणारा टेम्पो काळ बनून आला, तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोन जण जखमी 
Rajasthan : राजस्थानात 24 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसचा अध्यक्ष, मुख्यमंत्री भजनलाल शर्मांच्या जिल्ह्यात भाजप उमेदवाराचा पराभव  
राजस्थानमध्ये 37 पैकी 24 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसचा अध्यक्ष, मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भाजपचा पराभव
Pune Firing Case : दोन सूत्रधार पुण्यातून तर तीन हल्लेखोर दौंडमध्ये गजाआड, पुणे कोर्ट गोळीबार प्रकरणात 5 आरोपींना अटक; क्राईम ब्रँचची कारवाई
दोन सूत्रधार पुण्यातून तर तीन हल्लेखोर दौंडमध्ये गजाआड, पुणे कोर्ट गोळीबार प्रकरणात 5 आरोपींना अटक; क्राईम ब्रँचची कारवाई
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2026 | बुधवार
Pune Crime : मंदार किवळेची प्रकृती क्रिटिकल, पुढचे 72 तास सांगता येणार नाही; कोर्टाबाहेर गोळीबार झालेला तरूण वाचणार की...? ससूनचे डीन जाधवांनी दिली हेल्थ अपडेट 
मंदार किवळेची प्रकृती क्रिटिकल, पुढचे 72 तास सांगता येणार नाही; कोर्टाबाहेर गोळीबार झालेला तरूण वाचणार की...? ससूनचे डीन जाधवांनी दिली हेल्थ अपडेट 
Sunetra Pawar on Pune Firing : 'आरोपींना सोडणार नाही, पुणेकरांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड नाही'; कोर्टाबाहेरील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवारांची पहिली मोठी प्रतिक्रिया
'आरोपींना सोडणार नाही, पुणेकरांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड नाही'; कोर्टाबाहेरील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवारांची पहिली मोठी प्रतिक्रिया
Embed widget