Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
देशाच्या राजकारणात एक परवलीचा शब्द आहे... टीम बी... एखाद्या छोट्या पक्षामुळे मतांची विभागणी होऊन एखाद्या मोठ्या पक्षाला फायदा झाला, तर विरोधातला पक्ष टीम बी म्हणून छोट्या पक्षाला हिणवतो... मनसे, एमआयएम या पक्षांबाबत हा आरोप नेहमीचाच... प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीवर २०१९ आणि २०२४च्या विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं असेच आरोप केले... कधी व्यासपीठावरून, तर कधी खासगीत... पण वंचितमुळे भाजपला फायदा झाल्याचे दावे केले गेले... आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं डीलिमिटेशन विधेयकाबाबत सकारात्मक भूमिका घेतल्यानंतर त्यावर प्रश्न विचारायला वंचितनं सुरुवात केलीय... बघुयात राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा टीम बी ऐरणीवर येण्याचं कारण काय, या स्पेशल रिपोर्टमध्ये...
शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं डीलिमिटेशन विधेयकाला सशर्त पाठिंबा जाहीर केलाय...
त्यावरून निर्माण झालेल्या वादात आता वंचित बहुजन आघाडीनं उडी घेतलीय...
शरद पवारांच्या पक्षाला भाजपची बी टीम म्हणणार का?, असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली मायदेव-आंबेडकर यांनी केलाय....
प्रकाश आंबेडकरांच्या पत्नी असलेल्या अंजली मायदेव-आंबेडकर यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून या वादाला तोंड फोडलं...
शरद पवारांच्या पक्षानं डीलिमिटेशनबाबत घेतलेली भूमिका यामुळे पुन्हा चर्चेत आली अन् बी टीमचा मुद्दाही...
वंचितचा हल्लाबोल आणि शरद पवारांच्या पक्षाची डीलिमिटेशनबाबत भूमिका...
यावर महाविकास आघाडीतले इतर दोन पक्ष सावध भूमिका घेत असल्याचं चित्र आहे...
All Shows































