एक्स्प्लोर

Ranveer Singh : दीपिकाचा कल्की पाहून रणवीर सिंह झाला भावुक, बायकोच्या अभिनयाचं कौतुक करत म्हणाला, तुझ्या कामाची तुलना...

Ranveer Singh reaction on Kalki 2898 AD : दीपिका पादुकोण महत्त्वाच्या भूमिकेत असलेला कल्की हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यावर आता रणवीर सिंहची प्रतिक्रिया समोर आली आहे. 

Ranveer Singh reaction on Kalki 2898 AD  :  'कल्की 2898 एडी' ( Kalki 2898 AD) हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. या सिनेमाने सर्व सिनेमांचे रेकॉर्ड मोडत पहिल्याच दिवशी कोट्यवधींची कमाई केली. प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण (Deepika Padukone) अशी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरत असल्याचं चित्र आहे. या सिनेमात प्रत्येकाने त्याची भूमिका वठवण्याचा प्रयत्न केलाय. यावर अनेक कलाकार देखील प्रतिक्रिया देत असून या सिनेमाचं कौतुक केलं जातंय. अभिनेता रणवीर सिंहने (Ranveer Singh) देखील बायकोच्या या सिनेमाचं कौतुक केलंय. 

रणवीरने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर कल्कीचं पोस्टर शेअर करत सिनेमाचं कौतुक केलं आहे. तसेच त्याने अमिताभ यांच्यासाठी हा सिनेमा पाहावा असं आवाहन देखील केलंय. दीपिकाने तिची प्रेग्नंसी जाहीर केल्यानंतर हे जोडपं बरंच चर्चेत आलं आहे. त्यातच आता दीपिकाच्या या सिनेमामुळेही पुन्हा एकदा ती चर्चेत आली. यावर पोस्ट करत रणवीरने त्याच्या बायकोच्या अभिनयाचं कौतुक केलं  आहे. 

रणवीरने काय म्हटलं?

रणवीर सिंहने त्याच्या पोस्टमध्ये नाग अश्विन यांचं अभिनंदन करुन त्यांच्या सिनेमाचं कौतुक केलंय. तसेच त्याने प्रभास, कमल हासन आणि अमिताभ बच्चन यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. माझ्यासारखे तु्म्हीही अमिताभ यांचे फॅन असाल तर हा सिनेमा नक्की पाहा. दीपिकाविषयी बोलताना रणवीरने म्हटलं की, सिनेमातल्या प्रत्येक क्षणात तुझी मार्मिकता, काव्यमयता आणि शक्ती पाहायला मिळतेय. तु तुलनेच्याही पलिकडे आहेस, आय लव्ह यू...!

Ranveer Singh : दीपिकाचा कल्की पाहून रणवीर सिंह झाला भावुक, बायकोच्या अभिनयाचं कौतुक करत म्हणाला, तुझ्या कामाची तुलना...

'कल्की 2898 एडी'ने या चित्रपटांचे तोडले विक्रम

'कल्की 2898 एडी' बॉक्स ऑफिसवर दररोज विक्रम रचत आहे. हा चित्रपट तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. त्यापैकी या चित्रपटाने केवळ चार दिवसांतच हिंदी व्हर्जनमध्ये 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. 

'कल्की 2898 एडी'ने या वर्षी रिलीज झालेले 'मुंज्या' 'क्रू', 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' आणि 'आर्टिकल 370' या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर केलेल्या कमाईपेक्षा अधिक कमाई केली आहे.  चार दिवसांत 'कल्की 2898 एडी'ची हिंदी भाषेतील कमाई 110.5 कोटी रुपये आहे. 'मुंज्या'ची 24 दिवसांची एकूण कमाई 95 कोटींच्या आसपास आहे.'क्रू'ने बॉक्स ऑफिसवर 90 कोटी, तेरी बातो में उलझा जिया या चित्रपटाने 87  कोटी आणि आर्टिकल 370 ने 84 कोटींची कमाई केली आहे. 

ही बातमी वाचा : 

Kalki 2898 AD Worldwide Box Office Collection : जगभरात कल्कीचा डंका, वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस; चार दिवसात किती कमावले?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?

व्हिडीओ

Sanjay Raut On BMC Election : ठाकरे बंधूंच्या अपयशानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया
Sambhajinagar MIM Result : संभाजीनगरात एमआयएमची मुसंडी, 16 जागांवर आघाडी
Dhananjay Mahadik Kolhapur Celebration : कॉलर उडवली, दंड थोपटले; धनंजय महाडिक यांचा तुफान जल्लोष
Latur Congress Win : विलासरावांच्या आठवणी मिटवू हे रविंद्र चव्हाणांचे वक्तव्य भोवलं?
BMC Election Dipti Waikar Loses : रवींद्र वायकर यांना मोठा राजकीय धक्का,दीप्ती वायकर यांचा पराभव

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
Mira Bhayandar Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
Ichalkaranji Election Result : इचलकरंजी महापालिकेत भाजपची मुसंडी, शिव शाहू आघाडीला चित करत निर्णायक विजय, पाहा विजयी उमेदवारांची पूर्ण यादी
इचलकरंजी महापालिकेत भाजपची मुसंडी, शिव शाहू आघाडीला चित करत निर्णायक विजय, पाहा विजयी उमेदवारांची पूर्ण यादी
Ravindra Waikar : खासदार रवींद्र वायकर यांची जोगेश्वरीत पाटी कोरी, अनंत (बाळा) नर यांनी मैदान मारलं, मनसेच्या एका उमेदवारासह 8 उमेदवार निवडून आणले
रवींद्र वायकर यांना धक्का, अनंत (बाळा) नर यांनी मैदान मारलं, मनसेच्या एका उमेदवारासह 8 उमेदवार निवडून आणले
देवेंद्र फडणवीसांनी शिवाजी पार्कवरील सभेत नाव घेतलेल्या शीतल गंभीर 125 मतांनी जिंकल्या; रिकाऊंटींगची मागणी
देवेंद्र फडणवीसांनी शिवाजी पार्कवरील सभेत नाव घेतलेल्या शीतल गंभीर 125 मतांनी जिंकल्या; रिकाऊंटींगची मागणी
Embed widget