(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shamshera On Ott : सिनेमागृहात फ्लॉप ठरलेला रणबीरचा 'शमशेरा' ओटीटीवर रिलीज; वाणी कपूरने खास पोस्ट शेअर करत दिली माहिती
Shamshera : रणबीर कपूरचा 'शमशेरा' सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे.
Shamshera On Amazon Prime : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) गेल्या अनेक दिवसांनी 'शमशेरा' (Shamshera) या सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. या सिनेमात रणबीरसोबत वाणी कपूर (Vaani Kapoor), संजय दत्त (Sanjay Dutt) महत्त्वाच्या भूमिकेत दिसून आले होते. आता सिनेमागृहात फ्लॉप ठरलेला हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे.
'शमशेरा' सिनेमा 22 जुलैला सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. सिनेमागृहात हा सिनेमा जादू दाखवण्यात कमी पडला. सिनेमागृहात हा सिनेमा चांगलाच फ्लॉप झाला होता. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर आता हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. यशराजच्या बॅनरखाली निर्मिती करण्यात आलेला हा सिनेमा प्रेक्षक आता अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहू शकतात.
'शमशेरा' या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. या सिनेमात रणबीर दुहेरी भूमिकेत दिसत आहे. तर संजय दत्त नकारात्मक भूमिकेत दिसून येणार आहे. सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात कमी पडला असला तरी या सिनेमातील संजय दत्तच्या कामाचं प्रेक्षकांनी चांगलंचं कौतुक केलं आहे.
View this post on Instagram
वाणी कपूरने सोशल मीडियाच्या माध्यमातून हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाल्याची माहिती दिली आहे. वाणीने 'शमशेरा' सिनेमाचे एक खास पोस्टर शेअर केले आहे. हा सिनेमा हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. सिनेमागृहात 'शमशेरा' सिनेमा फ्लॉप ठरला होता. पण आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा आपली जादू दाखवू शकेल का याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
रणबीर कपूरने 'शमशेरा' सिनेमासाठी 20 कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे. सिनेमासाठी त्याने त्याच्या बॉडी आणि लूककडे विशेष लक्ष दिलं होतं. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा करण मल्होत्राने सांभाळली आहे. 150 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली होती.
संबंधित बातम्या