एक्स्प्लोर

Arun Govil : राजकारणात आल्यानंतर अभिनयक्षेत्राला अलविदा? 'रामायण'मध्ये 'राम' साकारणारे अरुण गोविल म्हणाले..

Arun Govil : 'रामायण' (Ramayana) या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेच्या माध्यमातून अरुण गोविल घराघरांत पोहोचले आहेत. आता ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. निवडणुकीनंतर अरुण गोविल अभिनयक्षेत्राला अलविदा करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Arun Govil : छोट्या पडद्यावरील 'रामायण' (Ramayana) या लोकप्रिय मालिकेच्या माध्यमातून अरुण गोविल (Arun Govil) घराघरांत पोहोचले आहेत. श्रीमाच्या भूमिका साकारुन त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. अरुण गोविल यांना प्रभू राम म्हणूनच पाहिलं जातं. अभिनयक्षेत्र गाजवल्यानंतर अरुण गोविल आता निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आता लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha 2024) भाजपने (BJP) अरुण गोविल यांना उतरवलं आहे. नितेश तिवारी (Nitesh Tiwari) यांच्या आगामी 'रामायण' चित्रपटात अरुण गोविल राजा दशरथच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर रणबीर कपूर प्रभू रामाच्या भूमिकेत दिसेल. राजकारणात एन्ट्री केल्यानंतर अरुण गोविल अभिनयक्षेत्राला अलविदा करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

राजकारणात आल्यानंतर अरुण गोविल मनोरंजनसृष्टीला राम-राम करणार?

अरुण गोविल आपल्या राजकीय कारकिर्दीबद्दल खूप उत्साही आहेत. नुकतेच त्यांनी अभिनय क्षेत्र पूर्णपणे सोडल्याचे उघडपणे सांगितले आहे. एका मुलाखतीत अरुण गोविल यांनी राजकारणानंतर अभिनयाच्या दुनियेत पुनरागमन करण्याबाबत सांगितले की,"अभिनयक्षेत्रापासून वेगळ्या असलेल्या माझ्या कारकिर्दीची ही एक नवीन इनिंग आहे आणि मी याबद्दल खूप उत्सुक आहे. आता हा नवा प्रवास कसा असेल याची मलाही उत्सुकता आहे".

उघडपणे काहीही बोलणार नाही : अरुण गोविल

अरुण गोविल पुढे म्हणाले,"याआधीदेखील मला राजकीय पक्षांकडून निवडणुकीला उभं राहण्याची विचारणा झाली आहे. पण त्यावेळी राजकारणात येण्याचा मी काहीही विचार केला नव्हता. राजकारणाचा प्रवास कसा होतोय यावर पुढची गणितं अवलंबून असतील. सध्या मी यावर उघडपणे काहीही बोलू इच्छित नाही. सध्यातरी माझं संपूर्ण लक्ष आगामी निवडणुकांवर आहे". 

'रामायण' चित्रपटाच्या सेटवरील अरुण गोविल यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र व्यस्त वेळापत्रकामुळे त्यांना हे फोटो पाहता आले नव्हते. अरुण गोविल सध्या त्यांच्या 'रामायण' चित्रपटांचं शूटिंग करत आहेत.

'रामायण'मध्ये कोणते कलाकार झळकणार?

नितेश तिवारी 'रामायण' तीन भागात प्रदर्शित करणार असल्याची चर्चा आहे. अभिनेता रणबीर कपूर  हा  प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणार आहे आणि साई पल्लवी सीतेची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात सनी देओल हनुमानाची तर बॉबी देओल कुंभकर्णाची भूमिका साकारणार आहे. याशिवाय अभिनेता यश हा रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. रकुल प्रीत सिंह शूपर्णखा आणि विजय सेतुपती हा विभीषणाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

संबंधित बातम्या

Lok Sabha Election BJP : अरुण गोविलच नाही तर रामायण-महाभारत मालिकेतील हे कलाकारही होते निवडणुकीच्या रणांगणात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manikrao Kokate : कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या अडचणीत वाढ, जुन्या वैर्‍याची लेक उतरली मैदानात, घेतला मोठा निर्णय
कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या अडचणीत वाढ, जुन्या वैर्‍याची लेक उतरली मैदानात, घेतला मोठा निर्णय
Stock Market : 15 रुपयांचा शेअर 2000 रुपयांवर पोहोचला 1 लाखांचे बनले एक कोटी, गुंतवणूकदार मालामाल
15 रुपयांच्या शेअरमुळं गुंतवणूकदार बनले कोट्याधीश, गुंतवणूकदारंना मालामाल करणारा शेअर किती रुपयांवर?
गज्या मारणे गँगवर मकोका लावला , पुणे पोलिसांनी काढली धिंड; हाती बेड्या, तोंडाला काळं बांधून शहरातून फिरवलं
गज्या मारणे गँगवर मकोका लावला , पुणे पोलिसांनी काढली धिंड; हाती बेड्या, तोंडाला काळं बांधून शहरातून फिरवलं
Ashok Harnawal on Neelam Gorhe : निलम गोऱ्हे विधिमंडळात लक्षवेधी आणून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायच्या; राऊतांनी उल्लेख केलेल्या पुण्यातील अशोक हरणावळांचा खळबळजनक आरोप
निलम गोऱ्हे विधिमंडळात लक्षवेधी आणून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायच्या; राऊतांनी उल्लेख केलेल्या पुण्यातील अशोक हरणावळांचा खळबळजनक आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ramdas Kadam on Sanjay Raut : मातोश्रीवर आम्ही किती मिठाईचे बाॅक्स पोहचवले हे माहित नाही का ?Ankush Kakde on Sanjay Raut : संजय राऊतांचं शरद पवारांवर वक्तव्य.... अंकूश काकडे म्हणतात...ABP Majha Headlines : 02 PM : 24 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सAshok Harnawal on Neelam Gorhe : उद्धव ठाकरेंवर बोलू नका, अन्यथा कुंडली बाहेर काढू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manikrao Kokate : कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या अडचणीत वाढ, जुन्या वैर्‍याची लेक उतरली मैदानात, घेतला मोठा निर्णय
कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या अडचणीत वाढ, जुन्या वैर्‍याची लेक उतरली मैदानात, घेतला मोठा निर्णय
Stock Market : 15 रुपयांचा शेअर 2000 रुपयांवर पोहोचला 1 लाखांचे बनले एक कोटी, गुंतवणूकदार मालामाल
15 रुपयांच्या शेअरमुळं गुंतवणूकदार बनले कोट्याधीश, गुंतवणूकदारंना मालामाल करणारा शेअर किती रुपयांवर?
गज्या मारणे गँगवर मकोका लावला , पुणे पोलिसांनी काढली धिंड; हाती बेड्या, तोंडाला काळं बांधून शहरातून फिरवलं
गज्या मारणे गँगवर मकोका लावला , पुणे पोलिसांनी काढली धिंड; हाती बेड्या, तोंडाला काळं बांधून शहरातून फिरवलं
Ashok Harnawal on Neelam Gorhe : निलम गोऱ्हे विधिमंडळात लक्षवेधी आणून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायच्या; राऊतांनी उल्लेख केलेल्या पुण्यातील अशोक हरणावळांचा खळबळजनक आरोप
निलम गोऱ्हे विधिमंडळात लक्षवेधी आणून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायच्या; राऊतांनी उल्लेख केलेल्या पुण्यातील अशोक हरणावळांचा खळबळजनक आरोप
कुंभमेळ्याहून परतताना भीषण अपघात, पहाटेच्या साखरझोपेतच कारमधील 6 जणांचा मृत्यू;  2 गंभीर जखमी
कुंभमेळ्याहून परतताना भीषण अपघात, पहाटेच्या साखरझोपेतच कारमधील 6 जणांचा मृत्यू; 2 गंभीर जखमी
PM Kisan : पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे 2000 शेतकऱ्यांना मिळणार, खात्यात पैसे न आल्यास काय करावं?
पीएम किसानचे 2000 रुपये 9 कोटी 70 लाख शेतकऱ्यांना मिळणार, रक्कम खात्यात जमा न झाल्यास काय करावं?
Manikrao Kokate : निवडून आल्यावर मुख्यमंत्र्यांनी दम दिला, मस्ती कराल तर घरी जाल, माणिकराव कोकाटेंनी सांगितलं महायुतीच्या कामकाजाचं गणित
निवडून आल्यावर मुख्यमंत्र्यांनी दम दिला, मस्ती कराल तर घरी जाल, माणिकराव कोकाटेंनी सांगितलं महायुतीच्या कामकाजाचं गणित
भारताकडून पाकचा पराभव, वसीम अक्रमकडून झाडाझडती
भारताकडून पाकचा पराभव, वसीम अक्रमकडून झाडाझडती
Embed widget