Ramayana : रणबीरच्या 'रामायण'मध्ये छोट्या सीता मातेच्या भूमिकेत झळकणार 'ही' बालकलाकार; 250 कलाकारांमधून झाली निवड
Ramayana Movie : नितेश तिवारी (Nitesh Tiwari) यांचा 'रामायण' हा चित्रपट शूटिंग आणि स्टारकास्टमुळे चर्चेत आहे. आता या सिनेमासोबत एका बालकलाकाराचं नाव जोडलं जात आहे. बालकलाकार कोण आहे? कोणतं पात्र साकारणार हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Ramayana : नितेश तिवारी (Nitesh Tiwari) यांच्या 'रामायण' (Ramayana) चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक याची प्रतीक्षा करत आहेत. कधी स्टारकास्ट तर कधी शूटिंग अपडेट्समुळे हा चित्रपट चर्चेत असतो. आता या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. या चित्रपटाच्या सेटवरील रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि साई पल्लवी (Sai Pallavi) यांचे राम-सीता मातेच्या रुपातील फोटो सोशल मीडियावर लीक झाले आहेत. अशातच आता या सिनेमासोबत आणखी एक नाव जोडलं जात आहे. एका बालकलाकाराची या चित्रपटात एन्ट्री झाली आहे. ती या चित्रपटात छोट्या सीता मातेच्या भूमिकेत झळकणार आहे.
टेलीचक्करच्या रिपोर्टनुसार, छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'भाग्य लक्ष्मी' फेम अभिनेत्री त्रिशा शारदा (Trisha Sarda) हिची 'रामायण' चित्रपटात एन्ट्री झाली आहे. त्रिशा 'रामायण' चित्रपटात छोट्या सीतेच्या भूमिकेत झळकेल. अद्याप निर्मात्यांनी यासंदर्भात काहीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण त्रिशाला या चित्रपटात पाहण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
'रामायण'ची स्टारकास्ट जाणून घ्या (Ramayana Movie Starcast)
'रामायण' या चित्रपटात रणबीर कपूर (Ranbir Kapoor) राम आणि साई पल्लवी (Sai Pallavi) सीता मातेच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच सनी देओल चित्रपटात हनुमानाच्या भूमिकेत झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे. केजीएफ स्टार यश या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
कोण आहे त्रिशा शारदा? (Trisha Sarda)
त्रिशा शारदा ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय बालकलाकार आहे. श्रीकृष्णाच्या भूमिकेसाठी ती ओळखली जाते. 'यशोमती मइय्या के नंदलाला' आणि 'बाल शिव','देवी कात्यायनी' या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. त्रिशा शारदाची 'रामायण' चित्रपटासाठी 250 लोकांवर मात करुन निवड करण्यात आली आहे. त्रिशाचा अभिनय चाहत्यांच्या पसंतीस उतरला आणि चित्रपटासाठी तिला लॉक करण्यात आलं.
'रामायण'च्या सेटवर नो फोन पॉलिसी लागू
'रामायण'च्या सेटवरील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नितेश तिवारीने सेटवर नो फोन पॉलिसी लागू केली आहे. तसेच शूटिंग संपेपर्यंत सेटवरील अतिरिक्त कर्मचारी आणि क्रू यांना सेटबाहेर जाता येणार नाही. नो फोन पॉलिसी लागू करण्यात आलेली असली तरी सेटवरील शूटिंगदरम्यानचे तसेच सेटचे फोटो लीक झाले आहेत. आता प्रेक्षकांना या बहुचर्चित चित्रपटाची उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या