Mumbai: उपद्रवी तळीरामांवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, 54 चारचाक्या जप्त, 62 हजारांचा दंड
स्थानिकांच्या या तक्रारीची तात्काळ दखल घेत एमआयडीसी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला.

Mumbai: अंधेरी पूर्वेतील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणाऱ्या 19 तळीरामांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. तक्षशिला सोसायटी आणि मॉडेल डाऊन सोसायटी परिसरात सार्वजनिक ठिकाणी गाड्या पार्क करून उपद्रव करणाऱ्या या व्यक्तींविरोधात स्थानिकांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. स्थानिकांच्या या तक्रारीची तात्काळ दखल घेत एमआयडीसी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी उपद्रव करणाऱ्या तळीरामांची 54 चारचाकी वाहने जप्त केली आहेत. या प्रकरणात पोलिसांनी एकूण 62,000 रुपयांचा दंडही वसूल केला आहे.
तक्षशिला सोसायटी व मॉडेल डाऊन सोसायटी परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी या प्रकाराबाबत वारंवार तक्रारी केल्या होत्या. गाड्या पार्क करून सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे, आरडाओरडा करणे, आणि इतर नागरिकांना त्रास देणे यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणी येत होत्या. पोलिसांनी या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत तातडीने कारवाई केली. या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणाऱ्या तळीरामांमुळे सोसायटी परिसरात निर्माण झालेला त्रास यामुळे कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. एमआयडीसी पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी अशीच कठोर भूमिका कायम ठेवण्याचे आश्वासन दिले आहे.
तळीरामांवर पोलिसांच्या कारवाईचा बडगा
मुंबईत सार्वजनिक ठिकाणी दारु पिऊन उपद्रव करणाऱ्या तळीरामांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. अंधेरी पूर्व भागातील नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर पोलिसांनी 54 चारचाक्या जप्त केल्या असून 62000 रुपयांचा दंड ठोठावला आहे.अंधेरीतील तक्षशिला सोसायटी आणि मॉडेल डाऊन सोसायटी परिसरात सार्वजनिक ठिकाणी गाड्या पार्क करून उपद्रव करणाऱ्या या व्यक्तींविरोधात स्थानिकांनी पोलिसांकडे तक्रार केली होती.स्थानिकांच्या या तक्रारीची तात्काळ दखल घेत एमआयडीसी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी उपद्रव करणाऱ्या तळीरामांची 54 चारचाकी वाहने जप्त केली आहेत. या प्रकरणात पोलिसांनी एकूण 62,000 रुपयांचा दंडही वसूल केला आहे.तक्षशिला सोसायटी व मॉडेल डाऊन सोसायटी परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी या प्रकाराबाबत वारंवार तक्रारी केल्या होत्या. गाड्या पार्क करून सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे, आरडाओरडा करणे, आणि इतर नागरिकांना त्रास देणे यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणी येत होत्या. पोलिसांनी या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत तातडीने कारवाई केली.
हेही वाचा:




















