Rohit Sharma Injury : मेलबर्न कसोटीतून रोहित शर्मा बाहेर? नेटमध्ये सराव करताना दुखापत; टीम इंडियाला मोठा धक्का
Ind vs Aus 4th Test Rohit Sharma Injury : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 साठी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका ऑस्ट्रेलियन भूमीवर खेळली जात आहे.
Rohit Sharma Knee Injury : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 साठी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका ऑस्ट्रेलियन भूमीवर खेळली जात आहे. पहिल्या तीन कसोटीनंतर मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. आता 26 डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये चौथा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. बॉक्सिंग डे कसोटीसाठी टीम इंडिया नेटमध्ये कसून सराव करत आहे, मात्र यादरम्यान काही खेळाडूंना दुखापत झाल्याची बातमी समोर येत आहे. शनिवारी केएल राहुलच्या हाताला चेंडू लागला, त्यावेळी तो उपचार होताना दिसले. रविवारी कर्णधार रोहित शर्मालाही दुखापत झाली आणि त्याच्या डाव्या पायावर बर्फाचा पॅक घातला होता. रोहितचे फोटो व्हायरल होत आहे, हिटमॅनची दुखापत गंभीर आहे की काय अशी भीतीही चाहत्यांना लागली आहे.
🚨 BIG RELIEF
— Vishal. (@SPORTYVISHAL) December 22, 2024
Captain Rohit Sharma got hit at his left knee during nets but is fine now. pic.twitter.com/2C9ams7l1s
फलंदाजीच्या सरावात रोहित शर्माला झाली दुखापत
टाइम ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, रविवारी टीम इंडियाच्या सराव सत्रादरम्यान रोहित शर्मा थ्रोडाउन स्पेशालिस्ट दयाचा सामना करत होता. यादरम्यान एक चेंडू त्याच्या डाव्या गुडघ्याला लागला. रोहितने फलंदाजी सुरू ठेवली, पण काही वेळाने त्याने टीम इंडियाच्या फिजिओची मदत घेतली. भारतीय कर्णधाराने आपले पॅड काढले, खुर्चीवर बसला आणि फिजिओने बर्फाचा पॅक काढला. जेव्हा पॅक लावला तेव्हा रोहितच्या चेहऱ्यावर वेदना दिसत होत्या.
🚨 ROHIT SHARMA HIT ON HIS LEFT KNEE IN THE NETS 🚨
— Tanuj Singh (@ImTanujSingh) December 22, 2024
- Captain Rohit Sharma hit on his left knee while batting in nets today at MCG. He batted for a bit after that but he looked in a bit of discomfort after the blow. (Sahil Malhotra/TOI). pic.twitter.com/rWITAJjwG3
रोहित शर्माला फारसा त्रास झालेला दिसत नसला तरी, फिजिओने त्याला सूज येऊ नये म्हणून खबरदारी म्हणून उपचार केले. बॉक्सिंग डे कसोटी सुरू व्हायला अजून काही दिवस बाकी आहेत, त्यामुळे रोहितकडे पूर्ण तंदुरुस्त होण्यासाठी पुरेसा वेळ आहे.
रोहित शर्माची खराब फॉर्मशी झुंज
भारताच्या चालू कसोटी हंगामात भारतीय कर्णधार रोहित शर्माची सतत फ्लॉप कामगिरी कायम आहे. बांगलादेश आणि न्यूझीलंडविरुद्धही त्याने निराशा केली आणि आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही तो आपली छाप सोडू शकलेला नाही. सध्याच्या मालिकेतील तीन डावांमध्ये रोहितच्या बॅटमधून केवळ 19 धावा आल्या आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. मेलबर्न कसोटीत त्याच्या बॅटकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे, तसे झाले नाही तर रोहित नक्कीच अडचणीत येऊ शकतो.
हे ही वाचा -