एक्स्प्लोर
मनोज वाजपेयीच्या ‘रुख’चा ट्रेलर रिलीज
‘रुख’ सिनेमाचा ट्रेलरही भावनाप्रधान आहे. मनीष मुंद्र यांची निर्मिती असलेला हा सिनेमा अतानु मुखर्जी यांनी दिग्दर्शित केला आहे.

मुंबई : ‘रुख’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. अभिनेता मनोज वाजपेयी आणि अभिनेत्री स्मिता तांबे यांची या सिनेमात मुख्य भूमिका आहे. वडिलांचा मृत्यू, त्या मृत्यूचं कारण शोधण्यासाठी मुलाचा संघर्ष अशा प्रसंगांवर सिनेमा बेतलेला असल्याचे ट्रेलरमधून दिसून येते.
18 वर्षीय ध्रुव नावाचा मुलगा आपल्या घरापासून दूर बोर्डिंगमध्ये राहत असतो. या दरम्यान त्याच्या घरात ज्या घडामोडी घडतात, त्या त्याला माहित नसतात. अशाच काळात अचानक ध्रुवचे वडील एका कार अपघातात मृत्युमुखी पडतात. त्यानंतर ध्रुवरचं आयुष्यच बदलून जातं.
वडिलांच्या अपघाती मृत्यूच्या दु:खातून ध्रुव सावरतो आणि मृत्युमागचं खरं कारण शोधण्याचा प्रयत्न करतो. ध्रुवचा हा संघर्षच या सिनेमाचं कथानक आहे.
‘रुख’ सिनेमाचा ट्रेलरही भावनाप्रधान आहे. मनीष मुंद्र यांची निर्मिती असलेला हा सिनेमा अतानु मुखर्जी यांनी दिग्दर्शित केला आहे.
पाहा ट्रेलर :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
राजकारण
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
