Rakesh Kumar Died : प्रसिद्ध बॉलिवूडपट 'याराना'चे दिग्दर्शक राकेश कुमार यांचं निधन; कॅन्सरशी झुंज अपयशी
Rakesh Kumar : बॉलिवूडचे लोकप्रिय दिग्दर्शक राकेश कुमार यांचं निधन झालं आहे. राकेश कुमार यांनी अनेक सुपरहिट सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे.
![Rakesh Kumar Died : प्रसिद्ध बॉलिवूडपट 'याराना'चे दिग्दर्शक राकेश कुमार यांचं निधन; कॅन्सरशी झुंज अपयशी Rakesh Kumar Died Famous Bollywood movie Yarana director Rakesh Kumar passed away Failure to fight cancer Rakesh Kumar Died : प्रसिद्ध बॉलिवूडपट 'याराना'चे दिग्दर्शक राकेश कुमार यांचं निधन; कॅन्सरशी झुंज अपयशी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/13/6df92e3abceb70bb75852f570f16b46e1668319669676254_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Rakesh Kumar Died : गेल्या काही दिवसांत मनोरंजनविश्वातून वाईट बातम्या समोर येत आहेत. आता लोकप्रिय बॉलिवूडपट 'याराना'चे दिग्दर्शक राकेश कुमार (Rakesh Kumar) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. अमिताभ बच्चन यांच्या कारकीर्दीतील अनेक सिनेमांचं दिग्दर्शन राकेश यांनी केलं आहे.
दिग्दर्शक राकेश कुमार यांच्या निधनाने बॉलिवूडध्ये शोककळा पसरली आहे. राकेश कुमार गेल्या काही दिवसांपासून कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होते. राकेश यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. राकेश कुमार यांना अमिताभ बच्चन यांनीदेखील श्रद्धांजली वाहिली आहे.
Legendary filmmaker Rakesh Kumar no more. He truly was a gentle giant & an incredible Director who gave massive hits alongwith @SrBachchan .He also was an incredible editor & choreographed iconic songs of Natwarlal. He taught me so much & so much was left.@KomalNahta pic.twitter.com/Xadz43zEkw
— Ashish Kaul (@aashishkaul) November 12, 2022
'खून पसीना', 'दो और दो पांच' आणि 'याराना' यांसारख्या अनेक गाजलेल्या सिनेमांच्या दिग्दर्शनाची धुरा राकेश कुमार यांनी सांभाळली आहे. तसेच 'मिस्टर नटवरलाल' या आयकॉनिक सिनेमाचंदेखील दिग्दर्शन केलं होतं. या सिनेमात अमिताभ बच्चन, रेखा, कादर खान आणि अमजद खान मुख्य भूमिकेत होते.
राकेश कुमार यांच्या शोकसभेचे मुंबईत आयोजन
राकेश कुमार यांच्या स्मरणार्थ कुटुंबीयांनी मुंबईत एक शोकसभा आयोजित केली आहे. मुंबईतील लोखंडवाला परिसरात या शोकसभेचं आयोजन करण्यात आलं आहे. अनेक सेलिब्रिटी त्यांच्या शोक सभेला उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या कुटुंबियांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात लिहिलं आहे,"राकेश कुमार यांच्या स्मरणार्थ, 18 ऑक्टोबर 1941 - 10 नोव्हेंबर 022. कृपया रविवार 13 नोव्हेंबर रोजी द सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लब, गार्डन नं. 5, लोखंडवाला, अंधेरी दुपारी 4 ते 5 वाजता श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित रहा".
दिग्दर्शन आणि निर्मितीशिवाय राकेश यांनी काही सिनेमांमध्ये अभिनयही केला होता. अमिताभ बच्चन यांच्यासह राकेश यांनी एकूण तीन सिनेमात काम केले होते. सलमान खान स्टारर सूर्यवंशी हा त्यांच्या शेवटचा सिनेमा.
संबंधित बातम्या
Siddhaanth Vir Surryavanshi: अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशीचं निधन; जीममध्ये वर्कआऊट करताना आला हृदयविकाराचा झटका
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)